मुंबई - राज्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव वेगाने होऊ लागला आहे. परभणी जिल्ह्यात पहिल्यांदा ८०० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्यानंतर बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर १५ जानेवारीला राज्यात तब्बल १००० हुन अधिक पक्षी बर्ड फ्ल्यूचे बळी ठरल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात एकूण ९ जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लूने आपले पाय पसरले आहेत.
राज्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्यानंतर १५ जानेवारीला विविध जिल्ह्यात एकूण १००० पेक्षा जास्त पक्षी मृत्यू मुखी पडले होते. त्यामध्ये ९८२ कुक्कुट पालनातील कोंबड्या आणि इतर ६७ पक्षांचा समावेश आहे. या मृत पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
राज्यातील पुणे, अहमदनगर, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड, सोलापूर आणि रायगड या जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. तर एकूण २२ जिल्ह्यामध्ये पक्षी मेल्याच्या घटनांची नोंद झाोली असल्याची माहिती आरोग्य विभागाकाकडून देण्यात आली आहे.