ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांकडून राज्याची प्रतिमा खराब, माधव भांडारींची उद्धव ठाकरेंवर टीका - भाजप प्रवक्ते माधव भांडारी

शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत दिली पाहिजे, असे ठाकरे यांनीच स्वतः मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यापूर्वी सांगितले होते. पण, आता राज्याच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर 2 महिने पूर्ण झाले तरी ते आता ही मदत देण्याचे नाव काढत नाहीत, अशी टीका भांडारी यांनी केली.

Madhav Bhandari Criticize CM Uddhav Thackeray
माधव भांडारींची उद्धव ठाकरेंवर टीका
author img

By

Published : Feb 5, 2020, 11:27 AM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील वक्तव्यामुळे राज्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. त्याचा विपरित परिणाम राज्यात नवी गुंतवणूक येण्यावर आणि रोजगारावर होणार असल्याची टीका भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज्याची आर्थिक परिस्थिती, हे मोठे आव्हान असून पैशांचे सोंग करता येत नाही, अशी हतबलता व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर भांडारी यांनी टीका केली आहे.

राज्यात नवी गुंतवणूक येण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे सबळ व सक्षम चित्र निर्माण होणे गरजेचे आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हतबलता व्यक्त करतात. 2014 ला केंद्रात आणि राज्यात परिवर्तन झाल्यानंतर चुंबकीय शक्ती निर्माण झाली आणि राज्यात मोठ्या प्रमाणात नवे उद्योग येण्यासाठी एमओयू झाले, असे त्यांनी मुलाखतीत मान्य केले. पण, उद्योग परत गेले असे सांगून त्यांनी आपल्याच शिवसेनेकडे असलेल्या उद्योग खात्याचे अपयशही सांगितले आहे. एमआयडीसी ओस पडल्या आहेत, असे ते म्हणतात. त्यावेळीही त्यांच्या पक्षाचे नेते सुभाष देसाई उद्योगमंत्री म्हणून 5 वर्षे पूर्ण अपयशी ठरल्याचेच ते कबूल करतात. असे निराशाजनक आणि हतबल चित्र मुख्यमंत्रीच मांडत असताना राज्यात नवी गुंतवणूक कशी येणार? असा सवाल भांडारी यांनी केला.

हेही वाचा - शेलारांच्या वक्तव्यावर शिवसैनिक आक्रमक; भाजप प्रदेश कार्यालयाबाहेरच लावले वादग्रस्त होर्डिंग

मुख्यमंत्री या नात्याने राज्यासमोरच्या समस्या सोडवण्याचे आव्हान आत्मविश्वासाने पेलण्याच्या ऐवजी उद्धव ठाकरे सत्तेच्या पहिल्या 2 महिन्यातच हतबलता व्यक्त करतात. आपल्या अपयशाचे खापर इतर कोणावर तरी फोडू पाहतात, हे आश्चर्यकारक आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत दिली पाहिजे, असे ठाकरे यांनीच स्वतः मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यापूर्वी सांगितले होते. पण, आता राज्याच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर 2 महिने पूर्ण झाले तरी ते आता ही मदत देण्याचे नाव काढत नाहीत, असे भांडारी म्हणाले.

उलट केंद्राकडून पैसे मिळाले, तर शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देता येतील, असा उधारीचा वादा करतात. त्यांनी मुळात 25 हजाराचे वचन केंद्र सरकारच्या भरवशावर दिले होते का, हे त्यांनी आधी सांगितले पाहिजे, असे आव्हानही भांडारी यांनी केले. कर्जमाफीचाही त्यांनी उधारीचा वादा केला असून आता आपण 2 महिने मुदत मागितल्याचे त्यांनी मान्य केले आहे, असे भांडारी म्हणाले.

हेही वाचा - टीईटीची पात्रता नसलेल्या 8 हजार शिक्षकांच्या सेवा संकटात; न्यायालयाच्या निर्णयानंतर शिक्षण विभागात हालचालींना वेग

Intro:

हतबल मुख्यमंत्र्यांकडून राज्याची प्रतिमा खराब, गुंतवणुकीस धोका
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची टीका

         राज्याची आर्थिक परिस्थिती हे मोठे आव्हान असून पैशाचे सोंग करता येत नाही, अशी हतबलता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारच्या मुलाखतीत व्यक्त केल्यामुळे राज्याच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला असून त्याचा विपरित परिणाम राज्यात नवी गुंतवणूक येण्यावर आणि रोजगार निर्मितीवर होणार आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी मंगळवारी केली.

         राज्यात नवी गुंतवणूक येण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे सबळ व सक्षम चित्र निर्माण होणे गरजेचे असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हतबलता व्यक्त करतात. २०१४ रोजी केंद्रात आणि राज्यात परिवर्तन झाल्यानंतर चुंबकीय शक्ती निर्माण झाली आणि राज्यात मोठ्या प्रमाणात नवे उद्योग येण्यासाठी एमओयू झाले असे त्यांनी मुलाखतीत मान्य केले आहे. पण उद्योग परत गेले असे सांगून त्यांनी आपल्याच शिवसेनेकडे असलेल्या उद्योग खात्याचे अपयशही सांगितले आहे. एमआयडीसी ओस पडल्या आहेत, असे ते म्हणतात, त्यावेळीही त्यांच्या पक्षाचे नेते सुभाष देसाई उद्योगमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण अपयशी ठरल्याचेच ते कबूल करतात. असे निराशाजनक आणि हतबल चित्र मुख्यमंत्रीच मांडत असताना राज्यात नवी गुंतवणूक कशी येणार, असा सवाल मा. माधव भांडारी यांनी केला.

         माधव भांडारी म्हणाले की, मुख्यमंत्री या नात्याने राज्यासमोरच्या समस्या सोडविण्याचे आव्हान आत्मविश्वासाने पेलण्याच्या ऐवजी मा. उद्धव ठाकरे सत्तेच्या पहिल्या दोन महिन्यातच हतबलता व्यक्त करतात आणि आपल्या अपयशाचे खापर इतर कोणावर तरी फोडू पाहतात हे आश्चर्यकारक आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत दिली पाहिजे, असे मा. उद्धव ठाकरे यांनीच स्वतः मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यापूर्वी सांगितले होते. पण आता राज्याच्या सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर दोन महिने पूर्ण झाले तरी ते आता ही मदत देण्याचे नाव काढत नाहीत. उलट केंद्राकडून पैसे मिळाले तर शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देता येतील, असा उधारीचा वादा करतात. त्यांनी मुळात पंचवीस हजाराचे वचन केंद्र सरकारच्या भरवशावर दिले होते का, हे त्यांनी आधी सांगितले पाहिजे. कर्जमाफीचाही त्यांनी उधारीचा वादा केला असून आता आपण दोन महिने मुदत मागितल्याचे त्यांनी मान्य केले आहे.

Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.