ETV Bharat / state

Javed Akhtar Moves In Sessions Court : आरएसएस विरोधातील वक्तव्य प्रकरण, गीतकार जावेद अख्तर यांची मुंबई सत्र न्यायालयात धाव

गितकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयं सेवक संघावर टीका केली होती. त्यांनी केलेल्या टीकेनंतर वकील संतोष दुबे यांनी जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी जावेद अख्तर यांना मुलुंड न्यायालयाने समन्स पाठवला आहे. त्या समन्सविरोधात जावेद अख्तर यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.

lyricist Javed Akhtar
गीतकार जावेद अख्तर
author img

By

Published : Jan 23, 2023, 10:47 PM IST

मुंबई - प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात राष्ट्रीय स्वयं सेवक संघाविरोधातील वक्तव्यावरुन मुलुंड महानगर दंडाधिकारी न्यायालयाने समन्स जारी केले होते. या विरोधात जावेद अख्तर यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये जावेद अख्तर यांनी तालिबान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोघांची तुलना केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. जावेद अख्तर यांना 6 फेब्रुवारीला मुलुंड न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स जारी करण्यात आले आहेत.

रास्व संघाकडून अधिकृत पत्र नाही : जावेद अख्तर यांचे वकील जय कुमार भारद्वाज यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत तक्रारदाराला संघटनेच्या वतीने मानहानीची तक्रार दाखल करण्याचा अधिकार पत्र देण्यात आले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कोणतेही अधिकार पत्र रेकॉर्डवर ठेवलेले नाही. प्रतिवादी क्र. 2 तक्रारकर्ता स्वतःला संघाचा समर्थक स्वयंसेवक म्हणवतो. तीन अभिव्यक्ती वेगवेगळ्या अर्थांना सूचित करतात. त्यामुळे तक्रारीच्या वाचनातून त्याची भूमिका काय आहे हे स्पष्ट होत नसल्याचे याचिकेत म्हटले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली : या प्रकरणात न्यायालयाने जावेद अख्तर यांना प्रत्यक्षात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या विरोधात वकील संतोष दुबे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्याने जावेद अख्तर यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केल्याप्रकरणी हा खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर न्यायालयाने जावेद अख्तर यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीसीमध्ये जावेद अख्तर यांनी पुढील सुनावणीसाठी प्रत्यक्षात न्यायालयासमोर हजर रहावे असे नमूद करण्यात आले आहे.

वकील संतोष दुबेंची जावेद अख्तर विरोधात तक्रार : तक्रारदार वकील संतोष दुबे यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भारतीय दंड संहिता आयपीसी कलम 499 आणि 500 बदनामीची कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी मुलुंड महानगर दंडाधिकारी न्यायालयात केली आहे. या प्रकरणात जावेद अख्तर यांच्या विरोधात समन्स जारी करण्यात आले होते.

काय आहे प्रकरण : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासारख्या संघटनांचेही लक्ष्य तालिबानसारखेच आहे. भारतीय संविधान त्यांच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, असे वक्तव्य जावेद अख्तर यांनी केले होते. त्यावरून वाद निर्माण झाला असून भाजपने अख्तर यांच्याकडे माफीची मागणी केली आहे. त्यामुळे जावेद अख्तर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

हेही वाचा - Encounter Specialist Pradeep Sharma Bail : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; जामीन अर्ज फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.