मुंबई : मला मंत्री म्हणून अशोक चव्हाण आणि नंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी संधी दिली. माझ्या वडिलांकडून भाई जगताप यांनी चार्ज घेतला होता आणि त्यांच्याकडून आज मी चार्ज घेतला. ही भावाकडून बहिणीला भाऊबीज आहे असे समजते. आमचे कौटुंबिक नाते आहे. काँग्रेस जे बोलते तेच करते. महिला सक्षमीकरणाच्या फक्त गप्पा मारता. महिलांना मात्र स्थान दिले जात नाही. पण काँग्रेस पक्षात याचा विचार केला जातो. महिलांना काँग्रेस नेते राजीव गांधी यांनी 33 टक्के आरक्षण दिले. मला पक्षश्रेष्टींनी दिलेली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडीन, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
लडकी हूँ लड सकती हूँ : समानता आली पाहिजे, लिंग भेद नको. लडकी हूँ लड सकती हूँ. येणारे पुढील दीड वर्ष अत्यंत महत्वाचे आहे. सत्ताधारी कडून दबाव येईल. आंदोलने चिरडली जातील. पण आपण तयार राहिले पाहिजे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. संजय निरुपम यांच्या काळात सर्वांत जास्त संघर्ष करावा लागला होता. प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान मिळेल. जे जे मला भेटायला येतील किंवा आले त्यांना मी सांगते तुम्ही अध्यक्ष आहात मी नाही. घराघरात पोहोचण्याचे काम आपल्यला करायचे आहे. येणाऱ्या काळात मुंबई महापालिका निवडणूक होणार आहे.आपण विरोधीपक्षात असल्याने आपल्याला अनेक आव्हानांना तोंड द्यायचे आहे. मुंबईकरांच्या प्रश्नासाठी मुंबई काँग्रेस आहे.राहुल गांधी यांनी भारत जोडो आंदोलन केले.राहुल गांधी यांच्या जन्मदिनी आपण प्रत्येक वॉर्डमध्ये मोहोब्बत कि दुकान सुरु करणार आहोत. येणाऱ्या मुंबई महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड मोठे यश मिळवून देणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
या कॉंग्रेस नेत्यांची उपस्थिती: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वर्षा गायकवाड आता काँग्रेसची धुरा किती यशस्वीपणे सांभाळतात हे भविष्यात स्पष्ट होणार आहे. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासहित माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप व संजय निरुपम, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर व प्रिया दत्त, माजी मंत्री सुरेश शेट्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार अस्लम शेख, अमीन पटेल व झिशान सिद्दीकी, माजी मुंबई काँग्रेसचे सर्व आजी माजी नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
हेही वाचा: