मुंबई - मुंबईची दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदी राज्य सरकराने लोकेश चंद्रा यांची नियुक्ती केली आहे. चंद्रा यांनी कुलाबा बेस्ट भवन येथे पदाचा कार्यभार स्वीकारला. आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान चंद्रा यांच्या समोर असणार आहे.
या पदांवर केले आहे काम
बेस्टच्या महाव्यवस्थापक पदी लोकेश चंद्रा लोकेश चंद्रा यांनी बेस्ट उपक्रमाचे प्रभारी महाव्यवस्थापक पी. दैलाम् यांच्याकडून बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला. ते स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर असून त्यांनी आय.आय.टी. (दिल्ली) मधून एस.टेक. ही पदवी देखील संपादन केली आहे. लोकेश चंद्रा हे १९९३ च्या बॅचमधील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी केंद्रीय पोलाद मंत्रालयात संयुक्त सचिव पदावर काम केले असून केंद्रीय ऊर्जा मंत्रालयात संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. त्याचप्रमाणे नागपुर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांचे जिल्हा अधिकारी म्हणून चंद्रा यांनी काम केले आहे. नागपुर महानगरपालिकेचे आयुक्त, नागपुर सुधार विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अशा विविध महत्वाच्या पदांवर देखील ते कार्यरत होते.
बेस्टला तोट्यातून बाहेर काढायचे आव्हान बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात आहे. बेस्टला ४ हजार कोटींचा तोटा आहे. पालिकेने बेस्टला २१०० कोटींचे अनुदान दिले आहे. त्यानंतरही बेस्ट आर्थिक तोट्यात आहे. बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान लोकेश चंद्रा यांच्या समोर असणार आहे.
हेही वाचा- 'आठ-दहा पत्रं पाठवली; तरीही महिला आयोगाच्या अध्यक्ष्यांची नियुक्ती नाही'