ETV Bharat / state

लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र नाहीत; सेना-भाजप नेत्यांचा निर्वाळा

लोकसभेसाठी युती करताना राज्यात विधानसभेच्या जागावाटपाचीही चर्चा पूर्ण झाली आहे. यामुळे आता राज्यात लोकसभेसह विधानसभा निवडणूक ही एकत्र होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे

शिवसेनेचे नेते रामदास कदम
author img

By

Published : Feb 21, 2019, 7:00 PM IST

मुंबई - शिवसेना आणि भाजपची युती घोषीत झाल्यानंतर आता दोन्ही पक्षात विधानसभेच्या जागावाटपाचीही चर्चा पूर्ण झाली आहे. यामुळे लोकसभेसोबतच विधानसभेसाठीही मुदतपूर्व निवडणूक होणार काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. निवडणूक एकत्र घेण्याचा कोणताही विषय चर्चेत नसल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते गिरीश बापट यांनी सांगितले. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनीही दोन्ही निवडणूक स्वतंत्र होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

सेना-भाजप नेत्यांचा निर्वाळा

शासकीय खर्च आणि व्यवस्थेतील ओढताण थांबवण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा मांडला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढच्या विधानसभेच्या निवडणूक लोकसभेसोबत घेतल्या असत्या तर निकालात काही फरक पडला असता, असा ही मत प्रवाह भाजपमध्ये आहे. लोकसभेसाठी युती करताना राज्यात विधानसभेच्या जागावाटपाचीही चर्चा पूर्ण झाली आहे. शिवसेनेच्या अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत. यामुळे आता राज्यात लोकसभेसह विधानसभा निवडणूक ही एकत्र होणार असल्याची चर्चा जोर धरत असतानाच मंत्री गिरीश बापट यांनी मात्र निवडणूक ठरवलेला होणार असल्याचा निर्वाळा दिला आहे.

तसेच शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनाही यासंदर्भात विचारणा केली असता, स्पष्टीकरण दिले. निवडणूक कधी घ्यायच्या. याचा निर्णय पक्षश्रेष्टी घेतील. मात्र, एकत्रित निवडणुकांच्या बाबतीत पक्षात कोणतीही चर्चा नसल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने लेखानुदानात जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ही वाढ केली आहे. या लोकाभिमुख योजनांचा लाभ घेण्यासाठी एकत्रित निवडणूक घ्याव्यात असाही युतीतल्या नेत्यांमध्ये मतप्रवाह आहे.

Intro:लोकसभा आणि विधानसभा एकत्र होणार नाहीत , भाजप - सेनेच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्वाळा

मुंबई २१

शिवसेना आणि भाजपाची युती घोषित झाल्या नंतर आता दोन्ही पक्षात विधान सभेच्या जागावाटपाचीही चर्चा पूर्ण झाली असून लोकसभे सह विधानसभेची ही मुदतपूर्व निवडणूक होणार काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे . पण दोंन्ही निवडणूका ठरलेल्या कार्यक्रम नुसारच होतील . निवडणूक एकत्र घेण्याचा कोणताही विषय चर्चेत नसल्याचे भाजपचे जेष्ठ नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरिष्ट बापट यांनी सांगितले . तर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनाही दोन्ही निवडणूक स्वतंत्र होणार असल्याचे संकेत दिले आहेत .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार शासकीय खर्च आणि व्यवस्थेतील ओढाताण थांबवण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्याचा विचार मांडला आहे . पण त्याची अंमलबजावणी अदयाप झालेली नाही . मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढच्या विधानसभेच्या निवडणूक लोकसभेसोबत घेतल्या असत्या तर निकालात काही फरक पडला असता , असा ही मत प्रवाह भाजप मध्ये आहे .लोकसभेसाठी युती करताना राज्यात विधानसभेच्या जागावाटपाचीही चर्चा पूर्ण झाली आहे . शिवसेनेच्या मागण्या मान्य झाल्या आहेत . आता राज्यात लोकसभेसह विधानसभा निवडणूक ही एकत्र होणार असल्याची चर्चा जोर धरत असतानाच मंत्री गिरीश बापट यांनी मात्र निवडणूक ठरवलेला होणार असल्याचा निर्वाळा दिला आहे .तसेच शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनाही यासंदर्भात विचारणा केली असता ,ते म्हणाले की , निवडणूक कधी घ्यायच्या याचा निर्णय पक्षश्रेष्टीं घेतील पण एकत्रित निवडणुकांच्या बाबतीत पक्षात कोणतीही चर्चा नसल्याचे त्यांनी सांगितले . निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने लेखानुदानात जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला .तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ही वाढ केली आहे. या लोकाभिमुख योजनांचा लाभ घेण्यासाठी एकत्रित निवडणूक घ्याव्यात असाही युतीतल्या नेत्यांमध्ये मतप्रवाह आहे . Body:..........Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.