मुंबई - महाराष्ट्र सरकारने कोणत्याही विक्रेत्यास ऑनलाइन दारू विक्री किंवा घरी पोहचवण्याची परवानगी दिली नाही. अशी आश्वासने देताना दिशाभूल करणार्या जाहिरातींना लोकांनी बळी पडू नये, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी सांगितले.
सोशल मीडियावर ऑनलाईन दारु विक्रीच्या जाहीराती पसरत आहेत. त्या पूर्णत: खोट्या आहेत. तसेच 24 मार्च ते 10 एप्रिल दरम्यान झालेल्या दारूबंदीच्या वेळी दारूच्या अवैध उत्पादन, वाहतूक आणि विक्रीसाठी 2,281 प्रकरणे नोंदविण्यात आली असून 892 लोकांना अटक करण्यात आली आहे. या काळात विभागाने 5.5 कोटी रुपयांची दारू आणि 107 वाहने जप्त केली आहेत.
अवैध दारूच्या व्यवसायाची सूचना टोल फ्री संपर्क क्रमांक 18008333333 आणि व्हॉट्सअॅप नंबर 8422001133 यावर देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.