ETV Bharat / state

अर्थसंकल्पामध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेबाबत घोषणा न केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी - अर्थसंकल्प मुंबई उपनगरीय रेल्वे

अर्थसंकल्पावर प्रवासी संघटनांनी देखील नाराजी व्यक्त केली असून उपनगरीय लोकलसाठी काहीच घोषणा केली नसल्याने मुंबईकरांच्या पदरी निराशा पडली आहे.

union budget 2020
अर्थसंकल्पामध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेबाबत घोषणा न केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी
author img

By

Published : Feb 1, 2020, 10:58 PM IST

मुंबई - दररोज उपनगरीय रेल्वेतून 85 लाख प्रवासी प्रवास करतात. आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे मुंबईकर प्रवाशांचे डोळे लागले होते. मात्र, अर्थमंत्र्यांनी रेल्वेच्या जुन्याच योजनांची नव्याने उजळणी केल्याने प्रवासी नाराज झाले असून, उपनगरीय लोकलसाठी काहीच घोषणा केली नसल्याने मुंबईकरांच्या पदरी निराशा पडली आहे.

अर्थसंकल्पामध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेबाबत घोषणा न केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

हेही वाचा - एलआयसीमधील सरकारी हिस्सा विकणार - केंद्रीय अर्थमंत्री

अर्थसंकल्पावर प्रवासी संघटनांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई उपनगरीय लोकलमधून रेल्वे मंत्रालयाला सर्वात जास्त महसूल उपलब्ध होतो. असे असताना अर्थमंत्र्यांनी मुंबई उपनगरीय लोकलचा उल्लेखही करू नये हे खेदजनक असल्याचे रेल यात्री परिषदेचे सुभाष गुप्ता यांनी म्हटले.

मुंबईकर प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आधीच रखडलेल्या एमयुटीपी 3 व 3 ए प्रकल्पासाठी यापूर्वी अर्थसंकल्पात 70 हजार कोटी रुपयांची घोषणा झाली होती. मात्र, आजच्या बजेटमध्ये त्याचा उल्लेखही न करण्यात आल्याने मुंबईकरांच्या वाटेला नेमके काय आले हे रेल्वे मंत्रालयाची पिंक बुक हाती आल्यावरच स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा - अर्थसंकल्पाचे उद्योग जगताकडून स्वागत, पुण्यातील मराठा चेंबर्समधील तज्ञांच्या प्रतिक्रिया

Intro:
मुंबई - दररोज उपनगरीय रेल्वेतून 85 लाख प्रवासी प्रवास करतात. आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे मुंबईकर प्रवाशांचे डोळे लागले होते. मात्र अर्थमंत्र्यांनी रेल्वेच्या जुन्याच योजनांची नव्याने उजळणी केली. मुंबईच्या उपनगरीय लोकलसाठी काहीच घोषणा केली नसल्याने मुंबईकर प्रवाशांच्या पदरी निराशा पडली आहे.
Body:याबाबत प्रवासी संघटनांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई उपनगरीय लोकलमधून रेल्वे मंत्रालयाला सर्वात जास्त महसूल उपलब्ध होतो. असे असताना अर्थमंत्र्यांनी मुंबई उपनगरीय लोकलचा उल्लेखही करू नये हे खेदजनक असल्याचे रेल यात्री परिषदेचे सुभाष गुप्ता यांनी म्हटले.
मुंबईकर प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी आधीच रखडलेल्या एमयुटीपी 3 व 3 ए प्रकल्पासाठी यापूर्वी अर्थसंकल्पात 70 हजार कोटी रुपयांची घोषणा झाली होती. मात्र आजच्या बजेटमध्ये त्याचा उल्लेखही न करण्यात आल्याने मुंबईकरांच्या वाटेला नेमकं काय आलंय हे रेल्वे मंत्रालयाची पिंक बुक हाती आल्यावरच स्पष्ट होणार आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.