ETV Bharat / state

राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

Maharashtra corona live updates
महाराष्ट्र कोरोना लाइव्ह अपडेट
author img

By

Published : Apr 29, 2021, 6:16 AM IST

Updated : Apr 29, 2021, 10:19 PM IST

22:16 April 29

आहेत शिक्षक मात्र काम करतात जिकरीचे; कोरोनाबाधितांच्या मदतीसाठी मोफत रिक्षा सेवा

आढावा घेताना प्रतिनिधी

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. वाढलेल्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याबरोबरच मुंबईतील गल्ली-बोळामध्ये रुग्णवाहिका लवकर पोहोचणे कठीण असते, अशा रुग्णांच्या सेवेत पेशाने शिक्षक असलेले दत्तात्रय सावंत धावून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी विनामूल्य रुग्णालय ते घरपोच अशी रिक्षा सेवा देत आहेत.

21:36 April 29

राज्यात 24 तासांत 68 हजार 537 रुग्ण कोरोनामुक्त, 771 मृत्यू

मुंबई - राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जरी वाढत असले तरी नव्याने रुग्ण वाढीचे प्रमाण जैसे थेच आहे. आजही (दि. 29 एप्रिल) राज्यात 66 हजार 159 रुग्णांची नोंद झाली आहे तर आज उपचारादरम्यान 771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मृत्यूदर 1.5 टक्के इतका आहे. तसेच राज्यात 24 तासांत 68 हजार 537 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तरी मृतांच्या संख्येत होणारी वाढ प्रशासनाच्या चिंतेत वाढ घालणारी आहे.

19:25 April 29

राज्यात 15 मेपर्यंत कडक निर्बंध

undefined
एएनआयचे ट्विट

राज्यात 15 मेपर्यंत कडक निर्बंध

18:42 April 29

विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई, पण पोलीस गाडीतच गर्दी

बोलताना पोलीस निरीक्षक

सोलापूर - शहर आणि जिल्ह्यात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. आरोग्य प्रशासन एकीकडे आटोकाट प्रयत्न करत कोरोना रुग्णांवर उपचार करत आहे. गर्दी करू नका, असे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. तरीही नागरिकांना याचे गांभीर्य नाही. या विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाला तैनात केले आहे. पण पोलिसांकडून देखील कोरोना नियमावली भंग होताना दिसत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची धरपकड करून पोलीस गाडीत भरले जात आहे. आज (29 एप्रिल) सकाळी शहर पोलीस हद्दीत विजापूर नाका पोलिसांनी कारवाई केली. पण कारवाई केलेल्या सर्व जणांना एकाच गाडीत दाटीवाटीने बसवून पोलीस ठाण्याकडे घेऊन गेले.

18:37 April 29

तृतीयपंथीयांना किराणा आणि कोरोना किटचे पुण्यात वाटप

माहिती देताना

पुणे - कोरोनाच्या या महामारीत गेल्या दीड वर्षांपासून मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी बांधवांना फटका बसला आहे. त्यामुळे मुकुल माधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनच्यावतीने तृतीयपंथीयांना किराणा आणि कोरोना किट, मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते करण्यात आले.

15:57 April 29

युवासेना विस्तारक राहुल लोंढेंनी ठाणे पालिकेला उपलब्ध करून दिला ऑक्सिजन

ठाणे - वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सर्वत्र हाहाकार माजला आहे. त्यात कोरोना रुग्ण वाढल्याने हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडादेखील जाणवत आहे. ठाण्यातही ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अशातच युवासेना विस्तारक राहुल लोंढे यांनी रायगडच्या एका कंपनीकडून ठाणे पालिकेला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध करून दिला आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाण्याला ऑक्सिजनचा पुरवठा मिळवण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू होते. त्यानंतर राहुल लोंढे यांनी रायगड येथून ठाणे महानगरपालिकेतील हॉस्पिटलला ऑक्सिजन मिळवून दिले. त्यामुळे अनेक रुग्णांचा जीव वाचला आहे. त्याचप्रमाणे मीरा-भाईंदर महानगरपालिकेलादेखील त्यांनी अशा प्रकारची मदत केलेली आहे.

15:11 April 29

काँग्रेस नेते राजीव सातव 'व्हेंटिलेटर'वर, प्रकृती स्थिर

माहिती देताना मंत्री कदम

पुणे - गुजरात काँग्रेसचे प्रभारी व माजी खासदार राजीव सातव यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील डॉक्टर आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी आज (दि. 29 एप्रिल) पत्रकार परिषद घेत त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली.

14:44 April 29

नाशिकमधील आरोग्य यंत्रणा हतबल; बेडसाठी रुग्णालयांच्या दारात याचना करण्याची रुग्णांवर वेळ

नाशिक - कोरोना प्रादुर्भावामुळे नाशिकमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे. वैद्यकीय यंत्रणा हतबल झाली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि बेडचा तुटवडा असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालयासमोर 30 ते 35 रुग्ण बेडच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र आहे. यामुळे रुग्ण आणि नातेवाईक हवालदिल झाले आहेत.

11:51 April 29

राज्यातील कोरोना उपाययोजनांसाठी काँग्रेस आमदारांची आर्थिक मदत

मुंबई - राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील परिस्थिती पाहता काँग्रेसच्या 53 आमदारांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आपले एक वर्षाचे वेतन कोरोना उपाययोजनांसाठी देणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र काँग्रेसकडून वाढीत पाच लाख रुपयांची मदत देखील मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केली जाणार आहे. संगमनेर येथील अमृत समूहातील सर्व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च बाळासाहेब थोरात उचलणार आहेत.

11:49 April 29

नाशिकमध्ये बेडसाठी रुग्णालयांबाहेर रांगा

नाशिक - कोरोना प्रादुर्भावामुळे नाशिकमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत आहे. अनेक रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन आणि बेडचा तुटवडा असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. मनपाच्या झाकीर हुसेन रुग्णालय समोर 30 ते 35 रूग्ण बेडच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.

11:01 April 29

माजी मंत्री पंकजा मुंडेंना कोरोनाची लागण

बीड - माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करून याबाबत त्यांनी माहिती दिली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्या विलगीकरणात आहेत. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

10:48 April 29

कोरोना लसीकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची आज(गुरूवार) बैठक बोलावली आहे. सायंकाळी 4 वाजून ३० मिनिटांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. राज्यातील मोफत कोविड लसीकरणाबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे. राज्यातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
 
09:33 April 29

बुलडाण्यात कोविड टेस्ट न करता रूग्णांवर उपचार?

बुलडाणा - खामगाव येथील डॉ. आशिष अग्रवाल यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांची कोविड चाचणी न करताच न्यूमोनियाचे रूग्ण सांगून त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा समोर आला आहे. विशेष म्हणजे या रुग्णाला 14 रेमडेसिवीर इंजेक्शनचे प्रिस्क्रिप्शन लिहून दिले गेल्याचा आणि 3 दिवसाच्या उपचारांचे अडीच लाख रुपये बिल काढल्याचे आरोप करण्यात आले आहेत. प्रकरणी मृत रूग्णाचा मुलगा योगेश बोबडे थेट मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपविभागीय पोलीस अधिकारी व खामगाव शहर पोलीस निरीक्षकांकडे मंगळवारी (27 एप्रिल) तक्रार दाखल दिली. रूग्णालयाचे मालक डॉ. आशिष अग्रवाल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याच रूग्णालयात काही दिवसांपूर्वी 35 वर्षीय रुग्णाची कोविड टेस्ट न करता सुरू असलेल्या उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.

08:26 April 29

दौंडमध्ये 4 कोरोनाबाधितांचा मृत्यू; कोरोनामुळे की ऑक्सिजन अभावी याबाबत संभ्रम?

पुणे(दौंड) - तालुक्यातील केडगाव येथील मोहन जनरल हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये काल(बुधवारी) चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन अभावी या रूग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे नेमका कशाने मृत्यू कशाने झाला याबाबत संभ्रम आहे. नातेवाईकांनी रूग्णालयात गोंधळ घातल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी यवत पोलिसांना पाचारण करावे लागले. या घटनेची माहिती मिळताच दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी रुग्णालयात धाव घेतली. 

08:07 April 29

नागपुरात काही हॅास्पिटलकडून रुग्णांची लूट, माजी महापौर संदीप जोशी संतप्त

नागपूर - नागपूरमध्ये एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सध्या कोरोना रूग्णांची संख्या जास्त असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीमध्ये काही खासगी हॅास्पिटल रूग्णांची लूट करत असल्याचा आरोपी माजी महापौर संदीप जोशी यांनी केला आहे. खासगी रूग्णालये ४ ते ५ लाख रूपये डिपॅाजीट घेतात. ‘रुग्णांची लूट थांबवा, अन्यथा रूग्णांसोबत रस्त्यांवर उतरू',असा इशारा जोशी यांनी दिला आहे. मनपाच्या ॲाडिटरवर माजी महापौर संदीप जोशींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

06:17 April 29

मुंबईत बुधवारी 44 हजार 629 हजार नागरिकांचे लसीकरण

मुंबई - मुंबईत लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यामुळे लसीचा सातत्याने तुटवडा जाणवत आहे. रविवारी दीड लाख लसीचा साठा येणार होता त्यामुळे सोमवार ते बुधवार असे तीन दिवस लसीकरण सुरू राहणार होते. मात्र, लसीचा साठा कमी असल्याने काल(बुधवारी) १३६ पैकी 75 लसीकरण केंद्रेच सुरू ठेवण्यात आली होती. त्यात, 44 हजार 629 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 23 लाख 99 हजार 844 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

06:04 April 29

राज्यात 63 हजार 309 कोरोनाबाधितांची नोंद; मृत्यूदर 1.5 टक्के

मुंबई - गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. शासन, प्रशासन आणि आरोग्य विभागाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे. राज्यात कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र, रूग्ण वाढीचे प्रमाण देखील 'जैसे थे'च आहे. राज्यात काल(बुधवारी) 63 हजार 309 नविन रूग्णांची नोंद झाली आहे. तर, उपचारादरम्यान 985 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 24 तासात 61 हजार 181 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

Last Updated : Apr 29, 2021, 10:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.