ETV Bharat / state

CORONA UPDATE : औरंगाबादमध्ये उद्यापासून लागू होणार लॉकडाऊन रद्द - महाराष्ट्र कोरोना लेटेस्ट अपडेट

corona happenings live update
महाराष्ट्र कोरोना ताज्या घडामोडी
author img

By

Published : Mar 30, 2021, 7:14 AM IST

Updated : Mar 30, 2021, 10:44 PM IST

22:18 March 30

राज्यात नव्या 27,918 रुग्णांची नोंद, १३९ रुग्णांचा मृत्यू

कोरोना रुग्णांच्या वाढीला काहीसा ब्रेक बसला आहे. ही जरी समाधानाची बाब असली तरी, रुग्णाची वाढ म्हणावी तितकी कमी झाली नाही. राज्यात आज 27 हजार 918 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. तर 139 जणांचा मृत्यू झाला आहे.

22:16 March 30

औरंगाबादमध्ये उद्यापासून लागू होणारा लॉकडाऊन रद्द

औरंगाबादमध्ये उद्यापासून लागू होणारा लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलिल यांनी लॉकडाऊन विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. इतरही अनेक संघटना छोटे-मोठे व्यावसायिक यांचा लॉकडाऊनला विरोध होता.

22:14 March 30

नागपुरात २४ तासात १,१५६ नवे कोरोनाबाधित, ५४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

मंगळवारी उपराजधानी नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोजच्या पेक्षा निम्याने कमी झाल्याचे आकडे आरोग्य विभागाकडून प्राप्त झाले आहेत. आज केवळ १,१५६ नागरिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. अर्थात आज केवळ ४,६०४ लोकांचीच कोरोना चाचणी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूर शहरात आणि जिल्ह्यात तब्बल १५ ते १७ हजार कोरोना टेस्ट केल्या जात होत्या. ज्यामध्ये दरदिवशी साडेतीन ते चार हजार रुग्ण कोरोनाबाधित आढळत होते.

22:13 March 30

मुंबईत आज 26 हजार 874 लाभार्थ्यांचे लसीकरण

मुंबईत आज 26 हजार 874 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 24 हजार 397 लाभार्थ्यांना पहिला तर 2 हजार 477 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 11 लाख 24 हजार 958 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 9 लाख 77 हजार 432 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 47 हजार 526 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 43 हजार 296 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 45 हजार 681 फ्रंटलाईन वर्कर, 5 लाख 38 हजार 169 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 97 हजार 812 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

20:28 March 30

मुंबईकरांनो घाबरू नका, रुग्णशय्या रिक्त, ३६ हजार रुग्णशय्या वाढवणार - पालिका आयुक्त

मुंबईत गेल्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरु झाला. जानेवारी फेब्रुवारीत काही प्रमाणात कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्ण संख्या वाढत असली तरी रुग्णालयांमध्ये रुग्णशय्या रिक्त असल्याने मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केले आहे. मुंबईत जंबो कोविड सेंटरमध्ये ९ हजार, लहान व मोठे खासगी रुग्‍णालये मिळून ७ हजार तर इतर रुग्णालयांमध्ये २० हजार अशा एकूण ३६ हजार रुग्णशय्या वाढवल्या जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

20:11 March 30

लॉकडाऊन लागल्यास उपासमारीची वेळ येईल - व्यापारी संघटना

महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक ठिकाणी  रात्री 8 वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.  परत एकदा लॉकडाऊनचे संकेत शासनाकडून दिले जात असताना आता समाजातील विविध स्तरावरून विरोधाचा सूर येऊ लागला आहे आणि यात सर्वात चिंतेत आहेत ते म्हणजे छोटे व्यापारी. सरकारने लॉकडाऊन लाऊ नये, यासाठी व्यापारी संघटना पुढे येत आहेत. मुंबईतील व्यापारी संघटनांनी सरकारला लॉकडाउन न करण्याचे आव्हान केलं आहे. तसे केल्यास छोट्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.  

20:11 March 30

मुंबईत आज ४,७५८ नवे रुग्ण, एकूण 49 हजार 167 अ‌ॅक्टीव्ह रुग्ण -

मुंबईत आज 4758 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 9 हजार 320 वर पोहोचला आहे. आज 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 11 हजार 671 वर पोहचला आहे. 3034 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 47 हजार 530 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 49 हजार 167 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 50 दिवस इतका आहे.  

20:11 March 30

मुंबईत 69 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन

मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 69 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 602 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 40 लाख 41 हजार 810 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.  

15:49 March 30

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्य सरकार अलर्टमोडवर, अधिसूचना जारी

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्य सरकार अलर्टमोडवर असून एकूण ऑक्सिजन उत्पादनापैकी ८० टक्के ऑक्सिजन पुरवठा वैद्यकीय वापरासाठी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आरोग्य विभागाची अधिसूचना जारी झाली असून ही अधिसूचना ३० जूनपर्यंत लागू राहणार आहे.

15:48 March 30

..अन्यथा मुंबईत रात्रीचे नियम दिवसा लावावे लागतील - अस्लम शेख

मुख्यमंत्री वारंवार विनंती करत आहेत बाहेर पडू नका, नियम पाळा.  पण कोण ऐकत नाहीय.  अशीच परिस्थिती राहिली तर  जे नियम रात्रीचे आहेत ते नियम सकाळी लावावे लागतील, असा इशारा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे.  

15:48 March 30

मास्क वापरला नाही म्हणून महापालिकेने दुकानातील फर्निचरच नेले उचलून

नाशिकच्या  सिडको भागात दुकानदारावर मास्क बाबत कारवाई न करता थेट दुकानातील फर्निचरच महापालिका कर्मचाऱ्यांनी उचलून नेल्याने दुकानदाराने पोलिसात धाव घेतली आहे. मनपा कर्मचारी दिवसाढवळ्या लूट करत असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी दुकानदाराने केली आहे.

15:48 March 30

..तर मुंबईत लॉकडाऊन लावावा लागणार - आयुक्त

मुंबईत कोरोनाचा प्रसार वाढत असताना १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण केले जात आहे. लसीकरणाचा वेग कमी आहे. हा वेग वाढवण्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरणाची परवानगी मागितली आहे. परवानगी मिळताच लसीकरणाचे लक्ष पूर्ण करू, अशी प्रतिक्रिया पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली. लोकांनी सहकार्य केले नाही तर मात्र लॉकडाऊन लावावा लागेल, अशी माहितीही आयुक्तांनी दिली.  

12:39 March 30

लॉकडाऊन हाच पर्याय नव्हे - प्रफुल पटेल

गोंदिया - राज्यातील जनता लाकडाऊनला कंटाळली आहे. कडक लॉकडाऊन केल्यास सामान्य जनतेचे खूप हाल होतात. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन करणे योग्य नाही. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लावणे हाच फक्त पर्याय नाही, असे मत माजी मंत्री प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले आहे.

12:35 March 30

दिवसाच्या लॉकडाऊनपेक्षा मास्क वापरणे सोपे - नाना पटोले

भंडारा - महाराष्ट्रात टेस्टींग वाढवल्याने कोरोनाचे रूग्ण जास्त दिसत आहेत. रुग्णसंख्या वाढत असली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. त्यापेक्षा सर्वांनी कोरोनाचे नियम पाळावेत. दिवसाच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण निर्माण होते म्हणून आम्ही रात्रीचा लॉकडाऊन केला आहे. आम्हीही लोकांची चिंता करत आहोत, असे मत नाना पटोले यांनी भंडाऱ्यामध्ये केले आहे. 

12:31 March 30

खासगी रुग्णालये व प्रसूती गृहांतील आयसीयू खाटा ताब्यात घेण्यास बीएमसीने केली सुरुवात

मुंबई - राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांची दररोजची संख्या 5 ते 6 हजारावर गेली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने खासगी रुग्णालयातील बेड ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर 360 आयसीयूसह आणखी 2 हजार 269 बेड उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला. जानेवारीपर्यंत कोरोनाला काही प्रमाणात आटोक्यात आणण्यात पालिकेला यश आले. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबईत येत्या सहा ते आठ आठवड्यात दिवसाला 10 हजार रूग्ण आढळतील, तसेच एकूण रूग्णसंख्या 21 हजारावर जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने तयारी केली आहे. 14 हजार असलेली बेडची संख्या 22 हजारावर नेली जाणार आहे. 

09:44 March 30

अहमदनगरमध्ये दहावी-बारावीचे वर्ग वगळता शाळा बंद

अहमदनगर - जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत आहे. कोरोनाची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आता बाधित रुग्णांना गृह विलगीकरणाऐवजी कोविड केअर सेंटरमध्येच दाखल केले जाणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्हा प्रशासन त्यासंदर्भातील आदेश जारी करतील, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

08:35 March 30

ठाण्यात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल

ठाणे - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दर शनिवारी आणि रविवारी दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, व्यापाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाला न मानता दिलेले आदेश मागे घ्या, अशी मागणी करत २७ मार्चला डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात काही व्यापाऱ्यांनी तोंडावर मास्क परिधान केले नव्हते, सामाजिक अंतराचेही पालन केले नव्हते. त्यामुळे कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पाटील यांच्या फिर्यादीवरून आंदोलनकर्त्या १२५ व्यापाऱ्यांवर डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

08:34 March 30

औरंगाबादमधील लॉकडाऊन ९ एप्रिलपर्यंत लांबणार

औरंगाबाद - जिल्ह्यात कलम 144 नुसार लावण्यात आलेल्या संचारबंदी आदेशामध्ये सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अंशत: बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील लॉकडाऊन आता 30 मार्च ते 8 एप्रिल ऐवजी 31 मार्च ते 9 एप्रिल असा असणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबाबत एक पत्रक जारी केले आहे.

07:17 March 30

पालकमंत्री छगन भुजबळांनी केली बाजारपेठेची पाहणी

नाशिक - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असून शहरासोबतच ग्रामीण भागातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला शहरातील भाजी बाजारासह गर्दीच्या ठिकाणांची पाहणी केली. त्यांन नागरिकांना आणि विक्रेत्यांना कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. नियमांचे काटेकोर पालन न केल्यास कठोर कारवाई करा, असे आदेश पोलीस व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

06:39 March 30

रविवारच्या तुलनेत सोमवारी रूग्णसंख्येत घट

मुंबई - गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्य शासन आणि प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. संसर्ग वाढू नये म्हणून काही ठिकाणी प्रशासनाने कडक लॉकडाऊन लावले आहे तर, राज्यभर नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. राज्यात रविवारच्या तुलनेत सोमवारी कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घट दिसून आली. रविवारी राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी ही 40 हजारांपेक्षा जास्त होती. सोमवारी त्यामध्ये घट झाली आहे. सोमवारी राज्यात 31 हजार 643 नवीन रुग्णांची नोंद झाली तर, कोरोनामुळे 102 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Last Updated : Mar 30, 2021, 10:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.