मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते त्यात गेल्या काही दिवसात घट झाली असून रुग्णांच्या संख्येत सतत चढउतार सुरू आहे. आज 570 रुग्णांची नोंद झाली आहे. आज 10 मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून तो 722 दिवसांवर पोहचला आहे.
#MAHACORONA LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर... - राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे नवे रुग्ण
20:27 June 22
मुंबईत मंगळवारी 570 नवे रुग्ण; 10 रुग्णांचा मृत्यू
10:02 June 22
राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ नवे रुग्ण
मुंबई - राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी येथे दिली.
महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील १०० सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आहे. १५ मे पासून ७५०० नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे २१ केसेस आढळून आले आहेत. या इंडेक्स केसेसची संपुर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण झाले होते का, त्यांना कोरोनाची पुन्हा लागण झाली का, याबाबत माहिती घेऊन त्यांच्या निकट सहवासिताची तपासणी केली जात आहे. अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
हेही वाचा - कोरोनाचा 'डेल्टा प्लस' स्ट्रेन आहे घातक; औषधांच्या परिणामाबाबतही साशंकता..
07:38 June 22
रिचर्डसन क्रुडास, गोरेगावच्या ‘नेस्को’ कोविड सेंटरमध्ये 2 हजार ऑक्सिजन बेड वाढणार
मुंबई - कोरोनाची तिसर्या लाटेचा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. दुसर्या लाटेदरम्यान ऑक्सिजन बेडची मागणी वाढली होती. या पार्श्वभूमीवर जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड वाढवण्यात येत आहेत. भायखळा येथील रिचर्डसन क्रुडास आणि गोरेगाव येथील ‘नेस्को’ जम्बो कोविड सेंटर- २ मध्ये प्रत्येकी एक हजार ऑक्सिजन बेड वाढवण्यात येणार आहेत. तसेच पोदारमध्ये ३० आयसीयू घेतले जाणार आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांना पुरेसे बेड उपलब्ध करून देण्यासाठी २२०० बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आल्याने मोठी सुविधा निर्माण झाली. याच धर्तीवर उपलब्ध बांधकामात गेल्या एकाच महिन्यात दीड हजार बेड सज्ज करण्यात आले आहेत. यामध्ये ५०० नियमित आणि एक हजार ऑक्सिजन बेड असतील अशी माहिती ‘नेस्को-२’चे डीन डॉ. संतोष सलागरे यांनी दिली.
पालिका आणि ताब्यात घेतलेल्या खासगी रुग्णालये व जम्बो सेंटरमधील बेडनुसार मुंबईत १० हजार ९३० ऑक्सिजन बेड आहेत. यातील १९०६ बेडवर रुग्ण दाखल असून ९ हजार २४ बेड रिक्त आहेत. तर एकूण २६३३ आयसीयूपैकी १२१६ आणि एकूण १४५० पैकी ५४२ व्हेंटिलेटर सध्या रिक्त आहेत.
हेही वाचा - मुंबईत रेकॉर्ड ब्रेक लसीकरण, एका दिवसात 1 लाख 8 हजार नागरिकांना लस
06:44 June 22
मुंबईत रेकॉर्ड ब्रेक, एका दिवसात 1 लाख 8 हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. योग दिनाचे औचित्य साधून सोमवार 21 जून पासून 30 ते 44 वयोगटातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. लसीकरणाला या वयोगटातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने दिवसभरात 1 लाख 8 हजार 148 लसीचे डोस देण्यात आले. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 45 लाख 70 हजार 915 लसीचे डोस देण्यात आले आहेत. बहुतेक लोकांचे नंबर न आल्याने लस न घेताच त्यांना घरी परतावे लागले.
सोमवारी रेकॉर्ड ब्रेक -
मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान सुरुवातीला दिवसाला 40 ते 50 हजार लसी दिल्या जात होत्या. गेल्या काही दिवसात 70 ते 93 हजार लसीकरण केले जात होते. सोमवारी 1 लाख 8 हजार 148 लसीचे डोस देण्यात आले आहेत. 16 जानेवारीपासून आतापर्यंतचे हे सर्वाधिक लसीकरण आहे.
05:59 June 22
#MAHACORONA LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर...
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. राज्यात सोमवारी नव्या 6,270 कोरोना रुग्णांची भर पडली असून 94 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच सोमवारी 13758 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सद्यस्थिती 124398 सक्रिय रुग्ण असून 57,33,215 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.89 टक्के एवढा आहे. तर राज्यात आतापर्यंत 1,18,313 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.