मुंबई : शिवसेना पक्षाच्या बांधणीसाठी जोमाने कामाला लागली आहे. पक्षाची बाजू खंबीरपणे मांडता यावी यासाठी शिवसेनेने नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. या नव्या यादीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अरविंद सावंत यांची मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आमदार भास्कर जाधव आणि अंबादास दानवे यांच्यासह काही नव्या चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक लक्षात घेता -
सचिन अहिर, शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, आनंद दुबे यांचीही शिवसेनेच्या प्रवक्तेपदी वर्णी लागली आहे. दुसरीकडे अॅड. अनिल परब, सुनील प्रभू, किशोरी पेडणेकर यांना प्रवक्ते म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. कोकणातील नेते भास्कर जाधव, आमदार अंबादास दानवे यांनाही संधी देण्यात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिक निवडणुका लक्षात घेता शिवसेना कामाला लागली असल्याचे यातून दिसत आहे. मात्र, शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांची या प्रवक्ते पदांच्या यादीत निवड झाली नाही.
वाचा, शिवसेना प्रवक्तेपदी कोण कोण?
१) संजय राऊत – राज्यसभा खासदार – मुख्य प्रवक्ते
२) अरविंद सावंत – खासदार (मुंबई) – मुख्य प्रवक्ते
३) प्रियंका चतुर्वेदी – राज्यसभा खासदार
४) अॅड. अनिल परब – परिवहन मंत्री
५) सुनील प्रभू – आमदार (मुंबई)
६) प्रताप सरनाईक – आमदार (ठाणे)
७) किशोरी पेडणेकर – महापौर (मुंबई)
या नवीन चेहऱ्यांना संधी -
१) शीतल म्हात्रे – नगरसेविका (मुंबई)
२) डॉ. शुभा राऊळ – माजी महापौर (मुंबई)
३) किशोर कान्हेरे (नागपूर)
४) संजना घाडी
५) आनंद दुबे (मुंबई)
६) सचिन अहिर – शिवसेना उपनेते
७) मनिषा कायंदे – विधानपरिषद आमदार
८) भास्कर जाधव – आमदार (रत्नागिरी)
९) अंबादास दानवे – विधानपरिषद आमदार (औरंगाबाद-जालना)
नव्या यादीत कोणाला स्थान नाही?
१) धैर्यशील माने – खासदार (कोल्हापूर)
२) डॉ. नीलम गोऱ्हे – विधानपरिषद आमदार
३) गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा मंत्री
४) उदय सामंत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
हेही वाचा - पीसीपीएनडीटी गुन्ह्यात इंदुरीकरांना दिलासा; निर्णयाविरोधात 'अंनिस' जाणार उच्च न्यायालयात
हेही वाचा - सोलापुरातील रुग्णालयात बेडची कमतरता नाही; सिव्हील सर्जन ढेले यांची माहिती