ETV Bharat / state

Parsi Day 2022 जाणून घेऊया पारशी नववर्ष किंवा नवरोझ म्हणजे काय

भारतामध्ये 15 ऑगस्ट रोजी पतेती सण Parsi Day आहे तर 16 ऑगस्ट या दिवशी पारशी समाज नववर्ष साजरे केले जाणार आहे पारशी नववर्षाचा Parsi New Year पहिला दिवस हा नवरोझ Nowruz म्हणून देखील ओळखला जातो पतेती हा पारशी लोकांचा सण असून पारशी समाजाच्या पारंपारिक झोरोस्टर कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा दिवस हा पतेती म्हणून ओळखला जातो या दिवशी पारशी बांधव अहुरा माजदाचे प्रतीक म्हणून अग्नीची पूजा करतात या उत्सवात पारशी समाजातील लोक चांगले विचार करण्याचा व चांगले शब्द बोलण्याचा आणि चांगली कामे करण्याचा प्रयत्न करतात

Parsi Day 2022
पारशी नववर्ष किंवा नवरोझ
author img

By

Published : Aug 16, 2022, 2:03 AM IST

मुंबई पतेती Parsi Day हा पारशी लोकांचा सण असून पारशी समाजाच्या पारंपारिक झोरोस्टर कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा दिवस हा पतेती म्हणून ओळखला जातो. या दिवशी पारशी बांधव अहुरा माजदाचे प्रतीक म्हणून अग्नीची पूजा करतात. या उत्सवात पारशी समाजातील लोक चांगले विचार करण्याचा व चांगले शब्द बोलण्याचा आणि चांगली कामे करण्याचा प्रयत्न करतात. भारतामध्ये 15 ऑगस्ट रोजी पतेती सण आहे. तर 16 ऑगस्ट या दिवशी पारशी समाज नववर्ष Parsi New Year साजरे केले जाणार आहे. पारशी नववर्षाचा पहिला दिवस हा नवरोझ Nowruz म्हणून देखील ओळखला जातो.

प्रतिक्रीया व्यक्त करतांना पारसी नागरिक

पतेतीच्या दिवस पारशी बांधू भगिनी सकाळी लवकर उठतात. या दिवशी सणानिमित्त विशेष स्नान केले जाते त्याला नहाना असे म्हणतात. त्यानंतर नवीन कपडे परिधान करून सर्वजण अग्यारीत प्रार्थनेला जातात. अग्यारी हे पारशी समाजाचे धर्मस्थळ आहे. अग्नी ही त्यांची पूज्यनीय देवता असून अग्यारीमध्ये सतत अग्नी प्रज्वलित ठेवलेला असतो. पतेतीच्या दिवशी धर्मोपदेशक विशेष प्रार्थना करून आशीर्वाद देतात. नंतर सर्वजण परस्परांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतात. पतेतीच्या दिवशी गरिबांना दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे गरजूंना अन्नदान केले जाते. त्याचप्रमाणे परस्परांना भेटवस्तू आणि मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या जातात. या दिवसाचे खास भोजन म्हणून सालीबोटी, मावा निबोई, पत्र निमाच्ची आणि रवा फालुदा हे पदार्थ केले जातात. असे पारसी समाजातील नाराया देसाई यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना सांगितले.

हेही वाचा Independence Day स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाज्या फुलांचा तिरंगा काढत सजली मुंबानगरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.