मुंबई - अंधेरी पूर्व येथे एका बिबट्याने अचानक कुत्र्यावर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी रात्री घडली. घटनेचे सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. ही घटना अंधेरी पूर्वतील सिपझ कंपनीच्या गेट क्रमांक 1 येथे समोरील रस्त्याला लागून असलेल्या ठिकाणी घडली.
हेही वाचा - राम नाईकांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पकडले कैचीत, शिवाजी महाराजांबद्दल केली 'ही' मागणी
कुत्रा पदपथावर बसलेला असताना अचानक बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्याने त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. इतक्यात तिथे काही माणसे आल्याची चाहूल लागताच बिबट्या पळ काढला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हा परिसर आरे कॉलनीला लागूनच असल्याने भक्षाच्या शोधात हा बिबट्या आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घटना रविवारी रात्री घडली. या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.