ETV Bharat / state

"शरीर सौष्ठवासाठी वापरण्यात येणाऱ्या उत्तेजीत द्रव्य विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी कायदा करणार" - RAJENDRA SHINGANE

विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून तज्ञांच्या समितीमार्फत अभ्यास करून राज्य शासन डिनीट्रो फिनॉल आणि स्टिरॉईड या उत्तेजीत द्रव्यांच्या ऑनलाईन आणि दुकानात विक्री प्रतिबंधासंदर्भात नवीन कायदा करणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री शिंगणे यांनी विधानसभेत दिली.

RAJENDRA SHINGANE
डॉ. राजेंद्र शिंगणे
author img

By

Published : Mar 4, 2020, 11:31 PM IST

मुंबई - गेल्या तीन महिन्यात राज्यामध्ये शरीर सौष्ठव करणाऱ्या पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे बुधवारी विधानसभेत पडसाद उमटले. यासंदर्भात लक्षवेधीला उत्तर देताना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी शरीर सौष्ठवासाठी वापरण्यात येणाऱ्या उत्तेजीत द्रव्य विक्रीला प्रतिबंध करण्याबाबत कडक कायदा करणार असल्याची घोषणा केली.

हेही वाचा - सुनिल जोशी नवे निवड समिती प्रमुख; BCCI ची घोषणा

तरुण वर्ग शरीर सौष्ठवसाठी स्टेरॉईड या उत्तेजित औषधांचे अतिसेवन करून मृत्यूस बळी पडत असल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. याबाबत शासन काय उपाययोजना करणार यासंदर्भात भाजप आमदार अमित साटम यांनी लक्षवेधी उपस्थिती केली होती. लवकरात लवकर सौष्ठव करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यात जीवघेणी उत्तेजके विकली जात आहेत. अनेकदा ऑनलाईन या पदार्थांची विक्री होते आहे. त्यामुळे राज्यात तीन जणांचा बळी गेला असून यावर शासन कोणतीही उपाययोजना करत नसल्याचा आरोपही साटम यांनी केला.

भाजप आमदार कॅप्टन तामिळ सेलवन यांनीही हा मुद्दा उचलून धरला. उत्तेजकांच्या विक्रीवर प्रतिबंध घालण्याचा कायदा केंद्र सरकारचा आहे. यात राज्य सरकारला मर्यादित अधिकार असल्याची बाब शिंगणे यांनी यावेळी बोलून दाखवली. यावर भाजप आमदार जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही कडक शब्दात तरुणांचे मृत्यू होत आहेत ते बघत बसायचे का? असा सवाल केला.

दरम्यान, सभागृहाची भावना लक्षात घेऊन राज्य स्तरावर यासंदर्भात लवकरच कायदा करण्याची तयारी शिंगणे यांनी दाखवली. विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून तज्ञांच्या समितीमार्फत अभ्यास करून राज्य शासन डीनीट्रो फिनॉल आणि स्टिरॉईड या उत्तेजीत द्रव्यांच्या ऑनलाईन आणि दुकानात विक्री प्रतिबंधसंदर्भात नवीन कायदा करणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री शिंगणे यांनी विधानसभेत दिली.

शिंगणे म्हणाले, शरीर वाढीसाठी, गर्भपातासाठीची औषधे, स्टिरॉईड, डायनायट्रोफिनॉल, अमिनो अ‌ॅसिड, गिलेटीन पावडरचे घटक असलेले औषध यांचा गैरवापर तसेच ऑनलाईन खरेदी-विक्री या सर्वांवर कायदेशीर बंदी आणून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी शासन सकारात्मक असून उत्पादक आणि विक्रीसंदर्भात अधिक कडक तरतुदी करण्यात येईल.

राज्यातील व्यायामशाळेत पूरक आहाराच्या माध्यमातून स्टेरॉईडचे घटक असलेले पदार्थ किंवा उत्तेजक घटक वितरीत केले जाते. वजन वाढणे किंवा कमी करणेसाठी ही द्रव्ये दिली जातात. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून अन्न निरीक्षक व औषध निरीक्षक तसेच पोलीस अधिकारी यांच्यासमवेत राज्यातील सर्व व्यायामशाळेची तपासणी पुढील सहा महिन्यात करण्यात येईल. अशा प्रकारची घटना आढळल्यास संबंधित व्यायाम शाळेवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा एकही लागण झालेला रुग्ण आढळला नाही - राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.