नाशिक: सध्या काँग्रेसमध्ये काही अलबेल नाही. तसेच, विधानसभेचे अध्यक्ष असताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने सरकार पडल असा प्रश्न उपस्थित करताच पवार म्हणाले आता या गोष्टीला एक वर्ष झाले. त्यामुळे त्यावर काय बोलणार. मात्र, पटोले जे अध्यक्ष झाले ते आज जे विरोधक आहेत त्यांच्या पाठिंब्याने झाले होते. त्यामुळे त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन द्यायला हवा होता. मात्र, तसे झाले नाही अशी नाराजीही पवार यांनी या वादावर व्यक्त केली आहे.
गुन्हेगारी वाढली : राज्यात गुन्हेगारी वाढली या प्रश्नावर पवार म्हणाले, सध्या कायदा सुव्यवस्थेवर लक्ष देणे ज्यांची जबाबदारी आहे, ते लक्ष देत नाहीत असे म्हणायला वाव आहे. दरम्यान, कोकणात पत्रकाराची हत्या झाली या प्रश्नावर आता पत्रकारांवरच ही वेळ आली म्हणल्यावर, राज्यात आता काय परिस्थिती आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे असे पवार म्हणाले आहेत. तसेच, रोज खून, अपघात, चोरी अशा घटना वाढत टचालल्या आहेत. त्याबाबतही पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांचा दौरा मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच दुसरा मुंबई दौरा केला. दरम्यान, या दौऱ्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार टीका केली आहे. मोदी यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे उद्घाटन काल करण्यात आली आहे. पंतप्रधानांचा कालचा हा महिनाभरात दुसरा मुंबई दौरा होता. त्यामुळे विरोधकांकडून याचा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीशी संबंध जोडला जात आहे. त्यावर पवार बोलले आहेत.
राजकीय भाषणे : नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, 'आता मुंबई महापालिका निवडणुका जवळ येत आहेत. त्या त्यांना जास्त महत्त्वाच्या वाटत असल्याच त्यांच्या या दौऱ्यातून दिसत आहे असे म्हणत पंतप्रधान मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई दौरा करत असल्याचे समोर आले आहे. मात्र, काही हरकत नाही. ते जर महाराष्ट्राला काही देणार असतील, राज्याचे काही हीत करत असतील तर विरोध करायचे आमचे काही कारण नाही. पण इथे येऊन राजकीय भाषणे करणार असतील, तर त्याचा विचार त्यांनीच करावा असा टोलाही पवा यांनी लगावला आहे.
आमच्याकडे संख्याबळ नाही : नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा बोलून दाखवल्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. पण 'अजित दादा मुख्यमंत्री व्हावे ही अनेकांची इच्छा असली तरी ती आमच्याकडे संख्याबळ नाही, संख्याबळ असते तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता' असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. शरद पवार हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर दिलखुलास संवाद साधला आहे.
हेही वाचा : Sanjay Raut Letter To Fadnavis: महाराष्ट्रात काय सुरू आहे? राऊतांचे फडणवीसांना पत्र