ETV Bharat / state

Lathicharge on Maratha Protester : मराठा आंदोलकांवर जालन्यात लाठीचार्ज; राज्यभरात मराठा समाज आक्रमक - Maratha Kranti Morcha Protest

Lathicharge on Maratha Protester: जालना इथं पोलिसांनी 'मराठा क्रांती मोर्चा' आंदोलकांवर तुफान लाठीचार्ज केला. त्याच्या निषेधार्थ आज राज्यभर 'मराठा क्रांती मोर्चा' आंदोलन करत आहे. मराठा आंदोलकांनी संताप व्यक्त करत काही ठिकाणी जाळपोळ केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

Maratha Kranti Morcha
संपादित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 12:04 PM IST

Updated : Sep 2, 2023, 1:52 PM IST

मुंबई/औरंगाबाद : Lathicharge on Maratha Protester : जालना इथं मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज ( Lathicharge on Maratha Protester ) केल्यानं राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 'मराठा क्रांती मोर्चा'च्या वतीनं राज्यभरात आंदोलन करण्यात येतंय. मराठा आंदोलक पोलीस विभागासह राज्य सरकारचाही निषेध व्यक्त करत आहेत. नंदुरबार, ठाणे, सोलापूर, बुलडाणा, आदी राज्यभर मराठा आंदोलक संतप्त झाले आहेत. आज राज्यभरातील मराठा आंदोलक सरकारचा निषेध करत घोषणाबाजी करत आहेत.

बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक

बीडच्या माजलगावमध्ये आंदोलनाला हिंसक वळण : बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं मोठा तणाव निर्माण झाला आहे. जालना येथील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी माजलगाव इथं जमलेल्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलकांनी काही दुकानावरही दगडफेक केली आहे. त्यामुळे आंदोक आक्रमक झाल्यानं पोलिसांनी घटनास्थळावरुन काढता पाय घेणं पसंत केलं. सध्या पोलीस दल परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असून माजलगावात तणावपूर्ण शांतता आहे.

संभाजीनगरात बस जाळण्याचा प्रयत्न : जालना इथं मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा संभाजीनगरात तिव्र निषेध करण्यात आला. यावेळी मराठा आंदोलकांनी शुक्रवारी रात्री बस जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शहरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता. आज सकाळीही पुंडलिकनगर परिसरात मराठा मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं क्रांतीचौकात आंदोलन करण्यात येत आहे. बिडकीन गावात आंदोलकांनी टायर पेटवून 'रास्तारोको' करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला.

मराठा क्रांती मोर्चा आंदोलक

नंदुरबार जिल्ह्यात बसफेऱ्या बंद : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं नंदुरबार शहरातील जगतापवाडी चौफुली परिसरात आंदोलन करण्यात आलं. सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. परंतु अजूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालं नसल्यानं लोकशाही मार्गानं आंदोलन करण्यात येत होतं. परंतु सरकार दडपशाही करत असून आंदोलकांवर अन्याय करत आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील 'मराठा क्रांती मोर्चा'च्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला असा आंदोलकांचा आरोप आहे. याचा निषेध करण्यासाठी आज नंदुरबार जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं आंदोलन करण्यात आलं. तर प्रशासनाकडून देखील खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेसदेखील आज बंद ठेवण्यात आल्या. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे.

हेही वाचा :

  1. Lathicharge on Maratha Protester : ...म्हणून लाठीचार्ज करावा लागला; पोलिसांनी दिले स्पष्टीकरण
  2. Lathicharge in Jalna: मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं आंदोलकांसह पोलीसही जखमी

Last Updated : Sep 2, 2023, 1:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.