मुंबई lathicharge in Jalna : जालना जिल्ह्यातील अंतरवली गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांनी काही सहकाऱ्यांसह उपोषण 29 ऑगस्टपासून उपोषण सुरू सुरू केलं. मात्र, मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर मनोज जरंगे यांना उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र त्यांनी आपलं उपोषण सोडलं नाही. त्यामुळं आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. पोलिसांनी बळाचा वापर करण्याची गरज नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शांततेचे आवाहन केलय.
बळाचा वापर करण्याची गरज काय : उपोषणकर्त्यासोबत चर्चा केल्यानंतर बळाचा वापर करण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. वरिष्ठांच्या सूचनेमुळेच हा प्रकार घडल्याचं सांगत शरद पवार यांनी पोलिसांचा निषेध केला आहे. हे थांबले नाही तर मला जालन्यात जाऊन आंदोलकांना धीर द्यावा लागेल, असंही शरद पवार यांनी म्हटलय.
लाठीहल्ला सरकारचा क्रूरपणा : जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज हा सरकारचा क्रूरपणा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण देताना त्यांची फसवणूक झाली आहे. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपर्यंत वाढवल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही. खोटे बोलून भाजपानं मते घेतली आहेत. लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरणे हा गुन्हा नाही. लाठीचार्ज घटनेचा मी निषेध करतो. मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्यांना मराठा समाज माफ करणार नाही. त्यांनी मराठा समाजाची माफी मागावी. लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई करावी, असं वड्डेटीवार यांनी म्हटलय.
जालन्यातील घटना अत्यंत दुर्दैवी : मुख्यमंत्री जालना येथे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, मी स्वतः उपोषणकर्त्यासोबत बोललो होतो. पोलीस अधिकाऱ्यांशी, जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं होतं. मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालवत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या हेतूनं पोलीस त्यांच्या जवळ जात असताना प्रकार घडला. मराठा समाजाला टिकणार आरक्षण देण्याची भूमिका आमच्या सरकारची आहे. आरक्षण टिकावं यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज होता कामा नये, अशी भूमिका सरकारची आहे. सर्वांनी शांतता राखावी, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलकांना तसंच मराठा समन्वयकांना केलं. शांताता प्रस्थापित करण्याच काम सर्वच राजकीय पक्षांनी केलं पाहिजे, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
आरक्षणावर वेळकाढूपणा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा मी तीव्र निषेध करतो, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. आंदोलकांवर पोलिसांनी बेछूट लाठीमार करून अश्रुधुराचाही वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर येतं आहे. मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारने समाजाचा अंत पाहू नये. या गंभीर प्रश्नावर केवळ वेळकाढूपणा होत असल्यानं समाज संतप्त आहे. बळाचा वापर करून आंदोलन चिरडता येणार नाही, असंही माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी म्हटलयं.
हेही वाचा -