मुंबई : दहिसर येथील गोपीनाथ मुंडे शक्ती मैदानावर अग्निशमन दलाच्या भरतीसाठी महाराष्ट्रभरातून महिला उमेदवार आल्या होत्या. यावेळी अग्निशमन दलाच्या भरतीसाठी 162 सेट सेंटीमीटर उंचीची अट ठेवण्यात आली. मात्र, त्यापेक्षा जास्त उंची असल्याचे सांगत अपात्र ठरलेल्या महिला उमेदवारांना संताप अनावर झाला आणि अखेर उद्रेक झाला.
बीएमसी हाय हायची घोषणाबाजी : महिला उमेदवारांनी मैदानाच्या परिसरातच बीएमसी हाय हायच्या घोषणाबाजी देण्यास सुरूवात केली. अग्निशमन दलाने घालून दिलेल्या निकषानुसार उंचीच्या नियमापेक्षा अधिक उंची असूनही या तरुणींना डावलण्यात आल्याचे या तरुणींचे म्हणणे आहे. शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महिला उमेदवारांना पाठिंबा देण्यात आला असून ही भरती प्रक्रिया रद्द केली नाही, तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून मुली जमल्या : संपूर्ण महाराष्ट्रातून या मुली जमल्या होत्या. मैदानात प्रवेश न मिळाल्याने मुलींनी मैदानाचे दुभाजक ओलांडून आत प्रवेश केला. उपस्थित मुलींकडून मुंबई अग्निशमन दलाची भरती रद्द करण्याची मागणी केली जात आहे. खरं तर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग (अग्निशमन विभाग) भरती मंडळ, मुंबईने डिसेंबर २०२२ मध्ये एकूण ९१० पदांसाठी अग्निशमन दलाची भरती केली होती. पात्र उमेदवारांना mahafireservice.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करण्याची संधी देण्यात आली होती. यानंतर, अर्जदारांना 13 ते 31 डिसेंबर आणि 1 ते 4 फेब्रुवारी 2023 या कालावधीत बायोडेटा आणि शैक्षणिक कागदपत्रांसह वॉक इन सिलेक्शनला उपस्थित राहावे लागले. असे सांगण्यात आले आहे.
मुंबई फायरमन भरती रद्द करण्याची मागणी : दोन-तीन दिवसांपासून आम्ही भरतीसाठी लांबून आलो आहोत. तरीही आम्हाला आतमध्ये प्रवेश दिला जात नसल्याचे मुलींचे म्हणणे आहे. अग्निशमन दलाच्या भरतीत अनेक आरोप करत या तरुणी अग्निशमन दलातील भरती रद्द करण्याची मागणी करत आहेत.
भरती प्रक्रियेवर आरोप : भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून आलेल्या तरुणींनी या भरती प्रक्रियेवर आरोप केले आहेत. यात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोपही तरुणींनी केला आहे. गेली 2 दिवस आम्ही इथे आलो आहोत, आम्ही शेतकऱ्यांच्या मुली आहोत, आम्हाला उंची असून डावलण्यात येत असल्याचा आरोप मुलींनी केला आहे. तर हा आमच्यावर अन्याय असून ही भरती प्रक्रियाच रद्द करावे अशी पोलिसांकडून ही भरती प्रक्रिया राबवा, अशी मागणी या तरुणींनी केली आहे.
हेही वाचा - Satyajeet Tambe : मी अपक्षच राहून कार्य करणार; सत्यजित तांबेंचे स्पष्टीकरण