मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे मुंबईत सुमारे २ हजार रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत ११३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये सातत्याने रुग्ण वाढत असल्याने मुंबई महापालिकेच्या २४ पैकी आठ विभागात कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. तर इतर पाच विभागात ६० ते ९२ रुग्ण आहेत. यामुळे मुंबईत सर्वच विभागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.
मुंबईत कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाची संख्या १ हजार ९३६वर तर मृतांचा आकडा ११३वर पोहचला आहे. मुंबईत सर्वांधिक कोरोनाग्रस्तांची संख्या प्रभादेवी, वरळी या ‘जी दक्षिण’ विभागात ३९०, भायखळा, नागपाडा या ‘ई’ विभागात १६२, ग्रँटरोड, मलबारहिल, वाळकेश्वर या ‘डी’ विभागात १३५, दादर-माहीम-धारावी या ‘जी-उत्तर’ विभागात १२३, अंधेरी पश्चिम विलेपार्ले जोगेश्वरी पश्चिम या 'के वेस्ट' विभागात १०६, वांद्रे ते सांताक्रूझ पूर्व या एच-पूर्व विभागात १०५, गोवंडी-मानखुर्द या ‘एम-पूर्व’ विभागात १०३ तर वांद्रे सांताक्रुझ पूर्व या 'एच-पूर्व' विभागात १०१ रुग्ण आहेत. मुंबईमधील या आठ विभागातील रुग्णांच्या आकड्याने शंभरी पार केली आहे.
तर कुर्ला एल विभागात ९२, भांडुप पवई विक्रोळी या एस विभागात ७१, शीव-अँटॉप हिल या एफ-उत्तर विभागात ६४, चेंबूर, देवनार या एम-पश्चिम विभागात ६३, मालाड पी-उत्तर विभागात ६०, परेल, शिवडी, लालबाग या एफ-दक्षिण विभागात ४७, पायधुणी या बी विभागात ४७, नरीमन पॉईंट-फोर्ट- कुलाबा या ए विभागात ४४, वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम या एच-वेस्ट विभागात ४२, घाटकोपर एन विभाग ४०, कांदिवली आर-साऊथ या विभागात ३९, गोरेगाव पी- साऊथ विभागात ३६, बोरीवली या आर-सेंट्रल विभागात २७, मुलुंड टी विभागात १३, दहिसर आर-नॉर्थ विभागात १३, चिराबाजार चंदनवाडी या सी विभागात १३ रुग्ण आढळून आले आहेत.
धारावीत ८६ रुग्ण, ९ मृत्यू -
धारावी सारख्या मोठ्या झोपडपट्टीत नव्याने २६ रुग्ण आढळून आल्याने धारावीतील रुग्णाची संख्या ८६ वर पोहचली आहे. त्यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीतील मुकुंदनगर येथे १८ , डॉ. बलिगा नगर ५ (तीन जणांचा मृत्यू), वैभव अपार्टमेंट २, मदिना नगर २, धनवाडा चाळ १, मुस्लीम नगर १८ (१ मृत्यू), सोशलनगर ८ (एक मृत्यू), जनता सोसायटी ८, कायलन वाडी ४ (२ मृत्यू), पीएमजीपी कॉलनी १, मुर्गन चाळ २, राजीव गांधी चाळ ४, शास्त्रीनगर केळा वखार ४, नेहरू चाळ येथे एकाचा मृत्यू, इंदिरा चाळ १, गुलमोहर चाळ १, ट्राझीट कॅम्प १, साई राज नगर १ व रामजी चाळ १, सूर्योदय सोसायटी १, लक्ष्मी चाळ १, शिवशक्ती नगर १ असे रुग्ण आढळून आले आहेत.