मुंबई - शुक्रवारी केरळच्या कोझिकोड येथे घडलेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे सुपुत्र वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव रविवारी दुपारी विशेष विमानाने मुंबई आणण्यात आले. आज सकाळी पवई चांदिवली नाहर येथील निवास्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही वैमानिक दीपक साठे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
दरम्यान, साठे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असताना एअरफोर्सच्या वतीनेही त्यांना मानवंदना देण्यात येत आहे. साठे यांच्या मुंबईतील पवई चांदिवली नाहर येथील निवास्थानी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात केले करण्यात आले आहे. वैमानिक दीपक साठे यांचे संपूर्ण कुटुंबही निवास्थानी दाखल झाले असून साठे यांच्यावर विक्रोळी टागोर नगर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.