ETV Bharat / state

सुशांतसिंह राजपूत अनंतात विलीन, वडिलांनी दिला मुखाग्नी - सुशांत सिंह राजपूत अंत्यसंस्कार

सुशांतच्या अंत्यसंस्काराला कुटुंबीयापैकी त्याचे वडिल, त्याची बहिण आणि तिचे पती उपस्थित होते. तसेच अभिनेत्री श्रद्धा कपूर, निर्माती एकता कपूर, सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे, सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती आणि गायक उदित नारायण उपस्थित होते. मात्र, बॉलीवूडमधील मोठ्या दिग्गज यावेळी दिसले नाहीत. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, कोरोनामुळे स्मशानभूमीत फक्त २० जणांना परवानगी होती. त्यामुळे अनेक स्टार्स आले नसावेत, अशाही चर्चा रंगल्या आहेत.

सुशांत सिंह राजपूतवर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार

author img

By

Published : Jun 15, 2020, 9:04 AM IST

Updated : Jun 15, 2020, 5:36 PM IST

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने रविवारी गळफास घेत त्याच्या वांद्रे येथील घरी (दि. 14 जून) आत्महत्या केली. आज त्याच्यावर मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या वडिलांनी त्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला असून सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी तो अनंतात विलिन झाला.

सुशांतच्या अंत्यसंस्काराला कुटुंबीयापैकी त्याचे वडिल, त्याची बहिण आणि तिचे पती उपस्थित होते. तसेच अभिनेत्री श्रद्धा कपूर, निर्माती एकता कपूर, सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे, सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती आणि गायक उदित नारायण उपस्थित होते. मात्र, बॉलीवूडमधील मोठ्या दिग्गज यावेळी दिसले नाहीत. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, कोरोनामुळे स्मशानभूमीत फक्त २० जणांना परवानगी होती. त्यामुळे अनेक स्टार्स आले नसावेत, अशाही चर्चा रंगल्या आहेत.

सुशांत सिंह राजपूतचे पार्थिव विलेपार्ले स्मशानभूमीत, थोड्याच वेळात अंत्यसंस्कार

सुशांतने रविवारी दुपारच्या सुमारास त्याच्या राहत्या घरात गळफास घेतला. त्याच्या अकाली जाण्याने कुटुंबीय, बॉलीवूडसह त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. कुपर रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्याने इतके टोकाचे पाऊस का उचलले? हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. तो मानसिक तणावात होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जाते, तर त्याची आत्महत्या नसून ही सुनियोजित हत्या असल्याचा आरोपही अभिनेत्री कंगणा रनौैतने केला आहे. तसेच त्याच्या मामाने देखील ही हत्या असून याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

कुपर रुग्णालयातून पार्थिव स्मशानभूमीकडे रवाना

'या' लोकांची होणार पोलीस चौकशी -

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने रविवारी त्याच्या वांद्रे येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या अचानक जाण्याने बॉलिवूडसह त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. ही घटना घडली त्यावेळी त्याच्या घरात २ स्वयंपाकी आणि क्रिएटिव्ह मॅनेजर हजर होते. त्यांचा जबाब देखील पोलिसांना नोंदवला आहे. सुशांत सिंह याच्या घरातून ज्या डॉक्टरचे वैद्यकीय कागदपत्र मिळाले आहेत, त्या डॉक्टरांचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. सुशांतची एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिचा देखील पोलीस जबाब घेणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी २४ तासांत ज्यांच्याशी संपर्क साधला होता, अशा सर्व व्यक्तींची पोलीस चौकशी करणार आहेत. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर तो कुठल्याही अंमली पदार्थांचे सेवन करत नसल्याचे आढळून आले आहे.

रिया चक्रवर्ती सोबत करणार होता लग्न -
सुशांतसिंह राजपूत याची मैत्रिण रिया चक्रवर्ती आणि मित्र महेश शेट्टी यांच्याशी पोलीस संवाद साधत आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत व रिया हे दोघे लवकरच लग्न करणार होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुशांत व रिया यांच्यात भांडणे सुरू होती. शनिवारी सुशांतने रियाला फोन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ती फोन उचलत नसल्याने त्याने त्यांचा कॉमन मित्र महेश शेट्टी याला फोन केला होता. मात्र, दोघांनीही फोन उचलला नसल्याचे समोर आले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी सुशांतला त्याच्या वडिलांनी लग्न करण्याबाबत विचारले होते, त्यावेळी त्याने होकार कळविला होता. मात्र, त्याच्या खासगी आयुष्याशी निगडीत काही गोष्टींचा तपास पोलीस करत आहेत.

सुंशातने दिलेले सुपरहीट चित्रपट -

सुशांतने 'कायपो चे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने शुद्ध देसी रोमांस, पीके, धोनी द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, सोनचिढीया आणि छिछोरे यासारख्या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. छिछोरे या चित्रपटातून त्याने खचून न जाता कुठल्याही संकटाचा खंबीरपणे सामना करावा. पण, आत्महत्या करू नये, असा संदेश दिला होता. मात्र, तोच सुशांत आज आत्महत्या करून आपल्यातून निघून गेला आहे.

सुशांतच्या अंत्यसंस्कारावेळच्या घडामोडी -

  • दु. ५.०८ - सुशांत अनंतात विलीन. वडिलांनी दिला मुखाग्नी
  • दु. ४.३९ - सुशांतच्या जाण्यामुळे मला धक्का बसला आहे. इतक्या कमी वयामध्ये तो जाईल असे वाटले नव्हते - उदिय नारायण
  • दु. ४.३१ - गायक उदित नारायण स्मशानभूमीत दाखल
  • दु. ४.१७ - सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती स्मशानभूमीत दाखल
  • दु. ४.०१ - एकता कूपर आणि सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेसह श्रद्धा कपूर स्मशानभूमीत दाखल
  • दु. ३.५६ - पार्थिव स्मशानभूमीत दाखल
  • दु. ३.५४ - कूपर रुग्णालयातून पार्थिव विलेपार्ले स्मशानभूमीकडे रवाना
  • दु. - ३.३० - सुशांतचे कुटुंब मुंबईत दाखल

Last Updated : Jun 15, 2020, 5:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.