ETV Bharat / state

दिलासादायक..! मुंबईमधून आज सर्वाधिक कोरोना रुग्णांना डिस्चार्ज; एकूण रुग्णांची संख्या 35273 वर - mumbai covid 19 test count

मुंबईमध्ये आज कोरोनाचे 1 हजार 438 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 35 हजार 273 वर पोहोचला आहे. मुंबईत 38 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 हजार 135 वर पोहोचला आहे.

mumbai covid 19 update
दिलासादायक..! मुंबईमधून आज सर्वाधिक कोरोना रुग्णांना डिस्चार्ज; एकूण रुग्णांची संख्या 35273 वर
author img

By

Published : May 28, 2020, 10:49 PM IST

मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा मुंबई हॉटस्पॉट झाला आहे. एकीकडे कोरोनाचे हजाराहून अधिक नवे रुग्ण रोज आढळून आले असताना आजच्या दिवशी कोरोनाच्या सर्वाधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज कोरोनाचे 1 हजार 438 नवे रुग्ण आढळून आले असून 38 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 763 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईमध्ये आज कोरोनाचे 1 हजार 438 नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 35 हजार 273 वर पोहोचला आहे. मुंबईत 38 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 हजार 135 वर पोहचला आहे. 38 मृतांपैकी 24 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. त्यात 19 पुरुष तर 13 महिला रुग्ण होत्या. मुंबईमधून आज सर्वाधिक रुग्णांना म्हणजेच 763 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 9 हजार 817 वर पोहोचली आहे.

कोरोनाच्या 27 मे पर्यंत 1, लाख 85 हजार 701 चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 27 मे रोजी 3 हजार 948 चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत 22 ते 27 मे दरम्यान कोरोनाच्या रुग्णांच्या वाढीचा दर 5 टक्के इतका आहे. तर घाटकोपर येथील एन विभागात, पी नॉर्थ, आर सेंट्रल तसेच भांडुप येथील एस विभागात कोरोनाच्या रुग्णांच्या वाढीचा दर 8 टक्क्यांहून अधिक आहे. मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 28 टक्के तर मृत्यू दर 3.2 टक्के असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.