ETV Bharat / state

Landslide Incidents Maharashtra: इरशाळवाडीसारख्या महाराष्ट्रात किती घडल्या आहेत दुर्घटना? माळीणची आजही अनेकांनाआठवण - Landslides in Maharashtra

रायगड जिल्ह्यात 19 जुलै रोजी मोठी दरड कोसळली असल्याची घटना घडली. राज्यात यापूर्वीही यासारख्या भूसख्खलनाच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी भूस्खलनाच्या मोठ्या घटनांबद्दल जाणून घेवू या.

Landslide Incidents Maharashtra
भूस्खलनाच्या घटना
author img

By

Published : Jul 20, 2023, 2:02 PM IST

Updated : Jul 20, 2023, 2:08 PM IST

मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूर नजिक इर्शाळवाडीत दरड कोसळण्याची घटना 19 जुलै म्हणजेच बुधवारी मध्यरात्री घडली होती. या घटनेत दहापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींवरील उपचाराचाही सरकार खर्च करत आहे. काही वर्षांपूर्वी अशीच माळीण दुर्घटना घडली होती.

माळीण दुर्घटना : पुणे जिल्ह्यात 2014 मध्ये भूसख्खलनाची घटना घडली होती. आंबेगाव तालुक्यात 30 जुलै 2014 रोजी माळीण दुर्घटना घडली होती. संपूर्ण डोंगर या माळीण गावावर कोसळला होता. त्यामुळे गाव यात गाडले गेले होते. सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेले 50 कुटुंबांचे गाव, डोंगर कोसळून काही मिनिटांतच गायब झाले होते. या दुर्घटनेत 151 लोक आणि 300 गुरे ठार झाली. हे राज्यातील एक मोठे भूसख्खलन होते.

2021 ते 2019 मधील भूस्खलनाच्या घटना : 23 जुलै 2021 रोजी रायगड जिल्ह्यात भूस्खलन झाले होते. यात ३६ जणांचा मृत्यू झाला. तर 18 जुलै 2021 रोजी पारसिक टेकड्यांवर भूसख्खलन झाले होते. टेकड्यांवरील गाळाचा महापूरात कळवा ठाणे जिल्ह्यातील घोलाई नगरच्या उतारावर असलेली झोपडी गाडली गेली होती. या झोपडीत पाच जणांचे कुटुंब राहत होते. ते जिवंत गाडले गेले. 2019 मध्ये कळव्यात दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. कळव्यातील अटकोनेश्वर नगर येथे डोंगर उतारावर एका झोपडीवर दरड कोसळली होती. 10 वर्षीय मुलगा आणि त्याचे वडील या दुर्घटनेत ठार झाले होते. तर त्याची आई किरकोळ जखमी होऊन बचावली होती.

2015 ते 2000 मधील भूस्खलनाच्या घटना : 19 जुलै 2015 रोजी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या भीषण भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला होता. लोणावळ्याजवळील आडोशी बोगद्याजवळ ही घटना घडली होती. मुंबईच्या उपनगरात जुलै 2000 मध्ये भूस्खलन झाले होते. अतिवृष्टीमुळे हे भूस्खलन झाले होते. त्यानंतर जमिनीची धूप झाली. अहवालानुसार या दुर्घटनेत सुमारे 67 लोक मरण पावले होते. ही देखील भूसख्खलनाची मोठी घटना होती.

हेही वाचा :

  1. Raigad landslide : रायगडमधील इर्शाळवाडीत दरड कोसळल्याने अनेकजण मलब्याखाली अडकले, घटनास्थळी मदतकार्य सुरू, पहा फोटो
  2. Heavy Rains In North India : उत्तरेतील राज्यांना पुराने वेढले; 37 नागरिकांचा बळी, लष्कर, एनडीआरएफच्या तुकड्या तैनात
  3. Video : रुद्रप्रयागमध्ये कोसळली दरड.. मोबाईलमध्ये भीषण दृश्ये झाली कैद

Last Updated : Jul 20, 2023, 2:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.