ETV Bharat / state

Lalit Patil Case Exclusive : छोटा राजनच्या साथीदारांच्या ललित पाटील कसा आला संपर्कात? वाचा सविस्तर...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 10:23 PM IST

Lalit Patil Case Exclusive: ड्रग्ज माफिया (Drug Mafia) ललित पाटीलने (Lalit Patil) पुण्यातील ससून रुग्णालयातून पलायन केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, मुंबई पोलिसांनी कर्नाटक हायवे नजीक असलेल्या चन्नासेन्ड्री या हॉटेलमधून बारावी शिकलेल्या ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या आहेत. नाशिक मधील स्थानिक असलेला ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील ड्रग्सच्या काळ्या धंद्यात कसे आले? तसेच कुख्यात गुंड छोटा राजनचा बोरिवलीतील कोण आहे साथीदार? याची एक्सक्लुझिव्ह माहिती 'ईटीव्ही भारत'च्या हाती लागली आहे. (Chhota Rajan Gang)

Lalit Patil Case Exclusive
ललित पाटील

मुंबई Lalit Patil Case Exclusive: ललित पाटील विरोधात 2023 मध्ये पुण्यातील बंड गार्ड पोलीस ठाण्यात दोन 'एनडीपीएस'चे गुन्हे दाखल आहेत. त्याआधी चाकण पोलीस ठाण्यात 2020 मध्ये ड्रग्ज माफिया ललित पाटील विरोधात 'एनडीपीएस'चा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यापासूनच ललित पाटील नावाचा ड्रग्ज माफिया पुणे पोलिसांच्या रडारवर आला. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याची पाळेमुळे शोधून काढण्यास सुरुवात केली. ललित पाटीलची दोन लग्न झाली असून त्याच्या पहिल्या बायकोचे निधन झाले आहे. तर दुसऱ्या बायकोला त्याने सोडचिट्टी दिली आहे. त्याचबरोबर तिसर्‍या एका वकील असलेल्या महिलेसोबत सध्या ललित पाटील राहत असल्याची माहिती मिळत आहे. ही कथित तिसरी पत्नी असलेली महिला वकील छोटा राजन गॅंगशी संबंधित असलेला ड्रग्ज माफिया आणि इतर ड्रग्जच्या केसेसमध्ये अडकलेल्या आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी मदत करते.

म्हणून ड्रग्ज निर्मितीत गुंतविला पैसा: छोटा राजनचा साथीदार तुषार काळे हा बोरिवली परिसरात राहत होता. मात्र एका खुनाच्या प्रकरणात कोल्हापुरातील कळंबा जेलमध्ये अटकेत असलेल्या तुषार काळेची ओळख जेलमधील शेळके नावाच्या एका गुन्हेगाराशी झाली. तसेच कळंबा जेलमधील जुबी नावाच्या नायजेरियन नागरिकाची ओळख शेळके व तुषार काळे यांच्याशी झाली. जुबी हा नायजेरियन आरोपी ड्रग्जच्या केसमध्येच कळंबा जेलमध्ये शिक्षा भोगत होता. जेलमधून सुटल्यानंतर तुषार काळेने त्याच्यामुळे पत्नीच्या सहाय्याने शूज विक्री तसेच कापड व्यवसाय थाटून पैसे कमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे झाले. दरम्यान तुषार काळे यानी शेळके सोबत भेट घेतली आणि ते दोघेही जुबीला भेटले. त्यावेळी जुबीने कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी एमडी या ड्रग्सच्या निर्मितीपासून पैसे कमावण्याची युक्ती दिली. त्यासाठी त्याने एमडी हा ड्रग्स कसा बनवायचा यासाठी भानुदास मोरे या ठाण्यातील कळवा जेलमध्ये बंद असलेल्या आरोपीशी संपर्क करून दिला. त्यानंतर जेव्हा जेव्हा भानुदास मोरे रिमांड कामे कोर्टात येईल तेव्हा तुषार काळे भानुदास मोरेला नातेवाईक किंवा मित्र म्हणून भेटायला येत असे आणि एमडी ड्रग्स बनवण्याची माहिती घेत होता. जुबीने तुषार काळेला सांगितले होते की, जे एमडी तू बनवशील ते मी स्वतः विकत घेईन. भानुदास मोरे कडून घेतलेली माहिती काळेने राकेश खानवडेकर याच्या मदतीने कर्जत येथे एक फार्म हाऊस विकत घेऊन त्या ठिकाणी एमडी ड्रग्ज बनवण्याची प्रक्रिया केली. मात्र, कर्जत येथे फार्महाउसवर बनवलेले एमडी दर्जेदार नव्हते. म्हणून तुषार काळे आणि राकेश कानवडेकर यांनी परशुराम जोगल या ठाणे शहरात राहणाऱ्या अंमली पदार्थाचा व्यवसाय करणाऱ्या आरोपीची ओळख काढून महाड येथे ट्रेनिंग घेतले.

इथूनच ललित पाटीलचा ड्रग्ज व्यवसायात प्रवेश: महाड येथे परशुराम जोगल, मंदार भोसले ठाण्यातील मुक्का मधील आरोपी मनोज पालांडे, अफजल संसारा, अरविंद कुमार लोहारे हे एमडी बनवून मुंबई ठाणे परिसरात विक्रीचे व्यवसाय करत होते. त्याआधी अरविंद लोहारे याच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात एमडी ड्रग्स बनवण्या संदर्भात गुन्हा दाखल झाला होता. त्याला जामिनासाठी ललित पाटील व त्याची कथित पत्नी यांनी मदत केलेली होती. इथूनच ललित पाटील याचा ड्रग्जच्या काळा बाजारात प्रवेश झाला. ललित पाटीलची कथित पत्नी वकील म्हणून काम करते आणि आरोपींना जामीन होण्यासाठी शहरातील चांगले वकील मिळवून देते. ललित पाटील हा आरोपी आणि वकील यांच्यातील आर्थिक व्यवहार पाहत असे. त्या बदल्यात ललित पाटील आणि त्याच्या कथित पत्नीला आरोपींकडून मोठी रक्कम मिळत होती. त्याचप्रमाणे ललित पाटील याने यापूर्वी अरविंद लोहारे, मनोज पालांडे आणि अफजल यांच्याकडून एमडी ड्रग्स घेतलेले होते, असे आरोपींनी पुणे पोलिसांना सांगितलेले आहे.

35 लाखात एमडी बनविण्याचे ट्रेनिंग: महाड मधील अल्केमी केमिकल्स आणि निंबस फार्मा या दोन बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये एमडी बनवण्याचे ट्रेनिंग अरविंद लोहारे याने परशुराम जोगल आणि तुषार काळे, राकेश खानवडेकर यांना दिले. त्या मोबदल्यात अरविंद लोहारे आणि त्याच्या साथीदारांना ट्रेनिंगचे 35 लाख रुपये दिले. दरम्यान किरण राजगुरू नावाचा आरोपी महाड येथील फॅक्टरीमध्ये कच्चामाल पुरवत होता. त्याची देखील ओळख तुषार काळे आणि राकेश खानवडेकर यांच्याशी झाली. नंतर तुषार काळे त्याने मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्स बनवण्याचे ठरवले आणि इतर ठिकाणी कुठे जागा भाड्याने मिळेल का याबाबत राजगुरूकडे विचारणा केली. राजगुरू हा मूळचा पुण्यातील शिरूर तालुक्यातील राहणारा होता. दरम्यान राजगुरू याने तुषार काळेला रांजणगाव एमआयडीसीमध्ये अशी कंपनी मिळेल असे सांगून मित्र चेतन दंडवते आणि किरण काळे यांच्या मदतीने कंपनीत जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. नंतर मिळालेल्या रांजणगाव एमआयडीसी मधील तुषार काळेने अंदाजे 132 किलो एमडी बनवला. ही कंपनी अशोक सपकाळ यांची होती. बनवलेल्या 132 किलो एमडी पैकी 112 किलो एमडी तुषार काळे आणि राकेश खानवडेकर यांनी मुंबईत आणून ते जुबीला विकले. या एमडी ड्रग्सच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून तुषार काळेने रांजणगाव येथे मदत करणाऱ्या किरण काळे, अशोक सपकाळ, चेतन दंडवते, अक्षय काळे यांना 67 लाख रुपये दिले.

ड्रग्सचा कारखाना सुरू करण्याचा प्लॅन: तुषार काळे याने एमडी विक्रीच्या काळ्या धंद्यातून मिळालेल्या पैशांमधून वसई तालुक्यात एक शेत जमीन विकत घेऊन त्या ठिकाणी असाच ड्रग्सचा कारखाना सुरू करण्याचा प्लॅन केला होता. दरम्यान राकेश खानवडेकर यांच्यावर एनसीबी विभागामार्फत एक गुन्हा दाखल झाला. या केसमधून सोडण्यासाठी तुषार काळेने जामीन करण्यासाठी मिळालेले पैसे वापरले. ऑक्टोबर 2020 मध्ये चेतन दंडवते अक्षय काळे व इतर तीन आरोपींना 20 किलो एमडीसह विक्री करताना ताब्यात घेतल्यानंतर 2019 मध्ये देखील ड्रग्स बनवले असल्याचे कबुली दिली. याप्रकरणात पोलिसांनी केलेल्या अधिक तपासात 2019 मध्ये महाड येथे ट्रेनिंग देणारा मनोज पालांडे, परशुराम जोगल, अरविंद लोहारे, अफजल संसारा यांचा शोध घेत असताना मनोज पालांडे, अरविंद लोहारे आणि अफजल संसारा याने ललित पाटीलशी संपर्क साधून जामीन मिळवून देण्याची विनंती केली आणि वेगवेगळ्या मार्गाने ड्रग्ज विकून मिळालेले 65 लाख रुपये ललित पाटील याला पाठवण्यात आले होते.

अनेक कारणाने रुग्णालयात दाखल: ललित पाटील याला उपनगर पोलीस स्टेशन नाशिक शहर या ठिकाणी बोलावून चौकशी केली असता त्याने पैसे मिळाल्याचे सांगितले आणि त्या रकमेपैकी 25 लाख रुपये उपनगर पोलीस स्टेशनमध्ये आणून हजर केल्याने त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती. मात्र ललित पाटील 12 दिवसांच्या पोलीस कोठडीत असताना दुसऱ्या दिवशी जिन्यावरून पडल्याचे नाटक करून जखमी झाल्याचा त्याने कांगावा केला होता. त्याने स्वतःला औंध हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतले. पुढे पोलिसांनी ससून हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट करून घेतले. ललित पाटीलने अनेक वेळा वेगवेगळी कारणे सांगून ससूनमध्ये ऍडमिट राहून पोलीस तपासात सहकार्य केलेले नसल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

ललित पाटीलच्या मोबाईलमध्ये दडलय काय? ललित पाटील याचा सॅमसंग कंपनीचा फोल्ड थ्री मॉडेलचा मोबाईल जप्त करण्यात पुणे पोलिसांना यश आले. मात्र, मोबाईल लॉक असल्याने तो अनलॉक करण्यासाठीचा पासवर्ड मिळवण्यासाठी ललित पाटील याला अनेक वेळा विचारपूस करण्यात आली. मात्र, पोलिसांना अनेक वेळा चुकीची माहिती देऊन चुकीचे पासवर्ड आणि पॅटर्न सांगून पोलिसांची दिशाभूल ललित पाटीलने केली आहे. महत्त्वाचा असलेला मोबाईलचा पुरावा नष्ट करण्याचा किंवा लपवण्याचा प्रयत्न देखील ललित पाटीलने केला आहे.

हेही वाचा:

  1. Lalit Patil Arrest : स्कॉर्पियोने पुणे ते कर्नाटकपर्यंत फिरला ललित पाटील अन् अडकला पोलिसांच्या जाळ्यात
  2. Devendra Fadnavis On Lalit Patil : ललित पाटील प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा इशारा; म्हणाले, कोणालाही...
  3. Sassoon Hospital Drug Racket : ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा तपास सीआयडीकडं सोपवा; आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.