ETV Bharat / state

कोतवाल संघटनांचे कामबंद आंदोलन मागे, मागण्यांबद्दल सरकार सकारात्मक - पाटील

कोतवालांच्या मानधनामध्ये भरीव वाढ, कोतवाल संघटनेस मान्यता, कोतवाल संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती करिता विशिष्ट कोटा निश्चित करणे, महिलांना सहा महिने प्रसूती रजा या मागण्यांसाठी कोतवाल संघटना आंदोलन करत होत्या.

चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Mar 6, 2019, 10:56 PM IST

मुंबई - गेल्या तीन महिन्यांपासून कोतवालांच्या विविध संघटनांचे कामबंद आंदोलन सुरू होते. हे आंदोलन आज मागे घेण्यात आले आहे. कोतवालांच्या विविध मागण्यांवर योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

कोतवालांच्या मानधनामध्ये भरीव वाढ, कोतवाल संघटनेस मान्यता, कोतवाल संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती करिता विशिष्ट कोटा निश्चित करणे, महिलांना सहा महिने प्रसूती रजा या मागण्यांसाठी कोतवाल संघटना आंदोलन करत होत्या. कोतवालांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी महसूलमंत्री पाटील यांनी आज राज्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयातील दालनात बोलावली होती. या बैठकीला राज्यातील विविध कोतवाल संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत कोतवालांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. कोतवालांच्या मागण्यांसदर्भात शासन सकारात्मक असून, मागण्यांवर योग्य निर्णय घेण्यात येईल असे यावेळी पाटील म्हणाले. यावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

तीन महिन्यांपासून विविध संघटनांकडून सुरु असलेले कोतवालांचे कामबंद आंदोलन मागे

कोतवालांच्या मानधनामध्ये भरीव वाढ, कोतवाल संघटनेस मान्यता, कोतवाल संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती करिता विशिष्ट कोटा निश्चित करणे, महिलांना सहा महिने प्रसूती रजा; अशा विविध मागण्यांसाठी कोतवाल संघटनांचे गेल्या तीन महिन्यांपासून काम बंद आंदोलन सुरु होते

मुंबई : कोतवाल संघटनेच्या विविध मागण्यांवर शासन सकरात्मक असून, त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल; असे आश्वासन महसूल मंत्री  चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या शिष्ठाईनंतर गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेले कोतवालांचे कामबंद आंदोलन आज मागे घेण्याची घोषणा कोतवाल संघटनेच्या वतीने करण्यात आली.

कोतवालांच्या मानधनामध्ये भरीव वाढ, कोतवाल संघटनेस मान्यता, कोतवाल संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती करिता विशिष्ट कोटा निश्चित करणे, महिलांना सहा महिने प्रसूती रजा; अशा विविध मागण्यांसाठी कोतवाल संघटनांचे गेल्या तीन महिन्यांपासून काम बंद आंदोलन सुरु होते. कोतवालांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी मंत्री श्री. पाटील यांनी आज राज्यातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयातील दालनात बोलावली होती. या बैठकीला राज्यातील विविध कोतवाल संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत कोतवालांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच, कोतवालांच्या मागण्यांसदर्भात शासन अतिशय सकारात्मक अशून, मागण्यांवर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले. यावर बैठकीस उपस्थित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत, गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेले कामबंद आंदोलन मागे घेण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.