ETV Bharat / state

बारावीच्या परीक्षेत कोकण विभाग अव्वल, यंदाही मुलींनीच मारली बाजी

बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. यंदा राज्यभरातून एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ८५.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

फाईल फोटो
author img

By

Published : May 28, 2019, 11:41 AM IST

Updated : May 28, 2019, 2:10 PM IST

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली. यंदा राज्याचा निकाल ८५.८८ टक्के लागला असून गेल्यावर्षीपेक्षा २.५३ टक्क्यांनी घसरला आहे. यामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून नागपूर विभाग पिछाडीवर आहे. याबाबत बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकारपरिषदेत माहिती दिली.

बारावीच्या निकालाबद्दल माहिती देताना बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे

बारावीच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये पार पडली होती. सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांचे निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच जाहीर झाले होते. त्यामुळे राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. अखेर हा निकाल आज जाहीर झाला आहे. दुपारी १ वाजता हा निकाल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहायला मिळणार आहे.

यंदा राज्यभरातून एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी ८ लाख ४२ हजार ९१९ विद्यार्थी आणि ६ लाख ४८ हजार १५१ विद्यार्थीनी आहेत. राज्यातील ९ हजार ७७१ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. यंदा विज्ञान शाखेतून सर्वाधिक ५ लाख ६९ हजार ४४६ विद्यार्थी, त्यापाठोपाठ कला शाखेतून ४ लाख ८२ हजार ३७२, तर वाणिज्य शाखेतील ३ लाख ८१ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ५८ हजार १२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

शाखानिहाय निकाल -

  1. विज्ञान शाखा निकाल - ९२.६० टक्के
  2. कला शाखा निकाल - ७६.४५ टक्के
  3. वाणिज्य शाखा निकाल - ८८.२८ टक्के
  4. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम - ७८.९३ टक्के

विभागनिहाय निकाल -

  1. पुणे विभाग - ८७.८८ टक्के
  2. नागपूर विभाग - ८२.५१ (सर्वात कमी)
  3. औरंगाबाद विभाग - ८७.२९
  4. मुंबई विभाग - ८३.८५
  5. कोल्हापूर विभाग - ८७.१२
  6. अमरावती विभाग - ८७.५५
  7. नाशिक विभाग - ८४.७७
  8. लातूर विभाग - ८६.०६
  9. कोकण विभाग - ९३.२३ (सर्वात जास्त)

Intro:Body:

12th result

Conclusion:
Last Updated : May 28, 2019, 2:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.