ETV Bharat / state

अनलॉक-४ मध्ये आणखी शिथिलता मिळणार?

जिल्हा, राज्याच्या सीमा १ सप्टेंबरपासून खुल्या होऊ शकतात. कारण करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घातलेले आहेत. मात्र, याचा आर्थिक व्यवहारांना फटका बसला आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयानं जिल्हा आणि आंतरराज्यीय वाहतूक सुरू करण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. राज्यातंर्गत आणि राज्याराज्यातील वाहतुकीवर निर्बंध असल्यानं याचा फटका अर्थव्यवस्थेला बसलेला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानेच ही बाब राज्यांच्या निर्दशनास आणून दिली असून, त्यामुळे १ सप्टेंबरपासून प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध पूर्णपणे हटवले जाण्याची शक्यता आहे.

know everything about unlock four
अनलॉक-४ मध्ये आणखी शिथिलता मिळणार
author img

By

Published : Aug 25, 2020, 2:37 PM IST

मुंबई- केंद्र सरकार सोशल डिस्टन्सिग आणि इतर नियमावली आखून देऊन १ सप्टेंबरपासून चित्रपटगृह सुरू करण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळाबरोबरच शाळा आणि कॉलेज उघडण्याचा निर्णय देखील राज्य सरकारांवर सोपवला जाणार असल्याची माहिती आहे. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार असली तरी मॉल्समधील चित्रपटगृह उघडण्यास दिली जाण्याची शक्यता कमी आहे.

देशात 5 ऑगस्टपासून सुरु झालेल्या अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यातजिम आणि योगाभ्यास संस्थांना मंजुरी देण्यात आली होती. तसंच कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन सुरु ठेवण्याचे आदेशही दिले होते. यात रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली होती. गेल्या टप्प्यात सरकारने सिनेमागृहे उघडण्यास मंजुरी दिली नव्हती. चौथ्या टप्प्यातही हे निबंध कायम राहू शकतात. तसंच सध्या तरी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे आणि रेल्वे सेवा सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मार्च महिन्यात लॉकडाउन केल्यानंतर सिनेमागृह, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर, बार यावर पूर्णपणे बंदी घातली होती. तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावरही बंधने घालण्यात आली होती. सरकारने अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यात वेगवेगळ्या नियमांसह शॉपिंग मॉल आणि धार्मिक स्थळांना परवानगी दिली होती.

कोरोना प्रादुर्भाव देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात एकूण 30 लाख 44 हजार 941 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 56 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाचा संसर्ग वाढण्याआधीच देशात केंद्र सरकारने मार्च महिन्यात लॉकडाउनची घोषणा केली होती. यानंतर सरकारने जूनमध्ये थोडी शिथिलता आणत अनलॉक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्याचा चौथा टप्पा आता सप्टेंबरमध्ये सुरु होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह विविध राज्यात सध्या असलेल्या सणांमुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी चौथ्या अनलॉकला सुरुवात होऊ शकते. अद्याप काही भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने अशा ठिकाणी नियम कायम ठेवले जाणार आहेत. जनजीवन आणि देशातील आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू अनलॉकची प्रक्रिया राबवली जात आहे. आता जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी 1 सप्टेंबरपासून देशात अनलॉक 4 सुरू होणार आहे

१ सप्टेंबरपासून दिल्ली बरोबरच मुंबईमध्ये १५ दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वार मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. या काळात मेट्रोच्या एका बोगीमध्ये केवळ ५० व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना परवानगी असणार आहे. मुंबईत यापूर्वीच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात आलेली आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना अजूनही लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

करोनाच्या वाढत्या प्रसारामुळे देशातील अनेक राज्यांनी शाळा बंदच ठेवल्या. केंद्रीय पातळीवर मागील काही दिवसांपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात आढावा घेणे सुरू असून, १ सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. विशेषतः केंद्र सरकार शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारवर सोपवू शकते. हवाई प्रवासी वाहतूक अंशतः सुरू करण्यात आलेली आहे. ती कायम ठेवली जाण्याची शक्यता आहे. कारण अनेक राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्यानं हवाई प्रवासी वाहतूक विस्तारण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकला जाणार आहे. हवाई प्रवासी वाहतूक अंशतः सुरू करण्यात आलेली आहे. ती कायम ठेवली जाण्याची शक्यता आहे. कारण अनेक राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्यानं हवाई प्रवासी वाहतूक मर्यादित ठेवण्यात आली आहे.

जिल्हा, राज्याच्या सीमा १ सप्टेंबरपासून खुल्या होऊ शकतात. कारण करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घातलेले आहेत. मात्र, याचा आर्थिक व्यवहारांना फटका बसला आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयानं जिल्हा आणि आंतरराज्यीय वाहतूक सुरू करण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. राज्यातंर्गत आणि राज्याराज्यातील वाहतुकीवर निर्बंध असल्यानं याचा फटका अर्थव्यवस्थेला बसलेला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानेच ही बाब राज्यांच्या निर्दशनास आणून दिली असून, त्यामुळे १ सप्टेंबरपासून प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध पूर्णपणे हटवले जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातही कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने विविध पातळीवर प्रयत्न केले आहेत. लॉकडाऊनमुळे आर्थिक बाजू आणि उद्योगांवर होत असलेल्या परिणामामुळे गेल्या दोन महिन्यांपासून काही प्रमाणात अटी शिथिल करण्यात आल्या. आता ऑगस्ट महिना संपत आला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात लॉकडाऊन कशाप्रकारे असेल अशी चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यात लॉकडाऊनचे आणखी काही नियम शिथिल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या बुधवारी मुंबईत होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन प्रश्नी विचारविनिमय होऊन निर्णय होण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.