मुंबई Kishori Pednekar News : कोविड काळात मुंबई महापालिकेने दिलेल्या कंत्राटाची मुंबई पोलीस आणि ईडीकडून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी कथित कथित बॉडी बॅग घोटाळ्यात (BMC Body bag scam) मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल करण्यात आलायं. यात अटकेच्या भीतीनं किशोरी पेडणेकरांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने चारआठवड्यांचा अंतरिम दिलासा देत अटकेपासून संरक्षण दिलयं. तसेच किशोरी पेडणेकरांना आर्थिक गुन्हे शाखेस चौकशीसाठी सहकार्य करण्यास सांगितलयं. आर्थिक गुन्हे शाखेने पाठवलेल्या समन्सनुसार आज सकाळी किशोरी पेडणेकर आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाल्या होत्या. आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांची तब्बल दोन तास चौकशी पार करण्यात आली आहे. गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ईडीमुळे पेडणेकरांच्या अडचणीत वाढ : मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीनं नुकताच गुन्हा दाखलं केलायं. महपालिकेत कोविड काळात मृतदेहाच्या कथित बॉडी बॅग खरेदी प्रकरणात आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी त्यांच्यावर पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलायं. आर्थिक गुन्हे शाखेनंतर ईडीने याप्रकरणात उडी घेतल्यानंतर पेडणेकरांच्या अडचणीत अजूनच वाढ झालीयं. महिन्याभरापूर्वी ईडीने किशोरी पेडणेकरांविरोधातील आरोपांप्रकरणाची कागदपत्रे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाकडून मागवली होती. या विभागाकडून पेडणेकरांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याच्या आधारे कागदपत्रे तपासल्यानंतर ईडीनं किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.
किशोरी पेडणेकरांवर आरोप काय? : कोविड काळात मुंबई महापालिकेकडून रुग्णालयांसाठी मृतदेहांच्या बॉडी बॅग करताना १८०० रुपयांची एक बॅग ६८०० रुपयांना विकत घेतल्याचं सांगितलं जातय. हा व्यवहार माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या सूचनेनुसार झाल्याचा आरोपही करण्यात आलाय. आर्थिक गुन्हे विभागाकडून कथीत आरोपांनंतर मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात ५ ऑगस्ट २०२३ ला किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात कलम ४२० अंतर्गत फसवणुकीचा तर कलम १२० ब अंतर्गत जाणीवपूर्वक कारस्थान करुन घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. महापालिकेत कोविड काळात कथीत चार मोठे घोटाळे झाल्याचे आरोप आहे.
हेही वाचा :
- Body Bag Scam Case : कोविड बॉडी बॅग प्रकरण; किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या, ED कडून गुन्हा दाखल
- Kishori Pednekar News : कथित बॉडी बॅग गैरव्यवहार प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना दिलासा, २४ ऑगस्टपर्यंत अटकेपासून संरक्षण
- SRA Scam Case : एसआरए घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना उच्च न्यायालयाचा दिलासा