मुंबई - किर्लोस्कर बंधू यांचे उद्योग क्षेत्रात मोठे नाव आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबातील अंतर्गत वाद हा आता मालमत्तेपर्यंत पोहचला आहे. यासंदर्भातला खटला आता मुंबई उच्च न्यायालयात सुरू करण्यात आला आहे. संजय चंद्रकांत किर्लोस्कर, आलोक संजय किर्लोस्कर, रमा संजय किर्लोस्कर, प्रतिमा संजय किर्लोस्कर यांना प्रतिवादी करत संजय यांची आई सुमन चंद्रकांत किर्लोस्कर यांनी हा दावा दाखल केला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धीरजसिंग ठाकूर यांच्या खंडपीठापुढे आज याबद्दल सुनावणी झाली. याचिकेतील मुद्दे पुरेसे स्पष्ट करून पुन्हा ही याचिका दाखल करा, असे म्हणत आजची सुनावणी तहकूब केली आहे. असाच वाद ठाण्यातील सिंघानिया कुटुंबातही घडला होता. यात मुलानेच वडिलांना घराबाहेर काढले होते.
काय आहे प्रकरण - 2017 या वर्षी जानेवारी महिन्यात किर्लोस्कर यांच्या पुण्यातील मॉडेल कॉलनीमध्ये राहत्या घरावर प्रवेशद्वार बांधणे सुरू होते. त्यातून संजय किर्लोस्कर आणि अतुल किर्लोस्कर या दोन्ही भावांमध्ये वाद झाला. याबाबत संजयच्या आईने शेवटी पुणे न्यायालयात खटला दाखल केला. यावेळी पुणे न्यायालयाने संजय किर्लोस्कर यांच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळेच सुमन चंद्रकांत किर्लोस्कर यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र सूट याचिका दाखल केली आहे.
घराचे गेट बांधण्यावरून झाला वाद - पुणे न्यायालयाने निकाल संजय किर्लोस्कर यांच्या बाजूने दिला. या निकालानंतर संजय किर्लोस्कर यांनी चंद्रकांत शंतनू किर्लोस्कर यांच्याकडे मालमत्तेत वाटे करण्याची मागणी केली. त्यानंतर पुणे दिवाणी न्यायालयामध्ये हे प्रकरण दाखल झाले. हिंदू अविभक्त कुटुंब असल्यामुळे त्या अंतर्गत हा खटला सुरू झाला. संजय किर्लोस्कर यांनी दिवंगत वडिलांच्या हिंदू अविभक्त कुटुंबामध्ये असतानाच्या दहा सूचिबद्ध कंपन्यांवर दावा सांगितला. त्यामुळे त्या कंपन्यांची वाटणी होणे अपरिहार्य झाले.
आईची उच्च न्यायालयात धाव - सुमन किर्लोस्कर यांची लकाकी कंपाउंड इमारतीमधील 16 हजार चौरस फुटाची स्वतंत्र मालमत्ता आहे. ती मालमत्ता स्वतंत्र असल्याचे ते मान्य करत नाही, असा दावा मुलगा संजय किर्लोस्कर यांनी याचिकेत केला आहे. परंतु, मृत्युपत्रात तसेच स्पष्टपणे म्हटल्याचे त्यांच्या मुलांचे म्हणणे आहे. ही बाब त्यांनी याचिकेमध्ये अधोरेखित केलेली आहे. मुलगा संजय किर्लोस्कर यांनी आईच्या विरोधात खटला दाखल केला. पुणे न्यायालयाने संजय किर्लोस्कर यांच्या बाजूने निकाल दिला. म्हणून त्या निकालाच्या विरोधात सुमन किर्लोस्कर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुंबई उच्च न्यायालयाने देखील या पूर्वी मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश दिले होते.
किर्लोस्कर कुटुंबात 1989 मध्ये वाटणी करार - चंद्रकांत शंतनू किर्लोस्कर हे आता हयात नाहीत .अपीलकर्ता यांनी शंतनू किर्लोस्कर हयात असताना सध्याच्या मोजमापानुसार अंदाजे 65 हजार 310 चौरस फूट संयुक्त मालमत्ता खरेदी केली होती. पुढे वाद झाल्यामुळे काय प्रमाणात वाटणी झाली पाहिजे, याबाबत 31 सप्टेंबर 1989 या वेळेला कौटुंबिक स्तरावर करार केला गेला आणि तो अंमलात आणला. मात्र, त्याबाबत देखील वाद प्रलंबित आहे. त्या प्रलंबित वादाला घराच्या प्रवेशद्वारावरील बांधकामामुळे ठिणगी पडली, याबाबतची माहिती याचिकेत दिसून येते.
सिंघानिया पिता-पुत्रांमधील संघर्ष देखील असाच - ठाण्यातील रेमंड कंपनीचे मालक विजयपथ सिंघानिया यांचा पुत्र गौतम आणि वडील यांच्यामध्ये देखील मालमत्ता प्रकरणी वाद झाल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. मुलाने वडिलांच्या मालकीची कंपनी, घर आणि इतर स्थावर मालमत्तांवर कब्जा करत वडिलांना बाहेर काढल्याचा आरोप स्वतः विजयपथ सिंघानिया यांनी केला होता. गौतम सिंघानिया आणि त्यांचे वडील विजयपथ सिंघानिया यांच्यामध्ये देखील वाद झाला आणि अखेर त्या वादाचे पर्यावासन इतके झाले की वडिलांनी मुलाला सर्व मालमत्ता दिली. नंतर मुलाने वडिलांना बाहेर काढण्याची घटना घडली होती. वडिलांना मुलाने मलबार हिलमधील ज्या सोसायटीत ते राहत होते त्या सोसायटीच्या कार्यालयातून देखील हाकलून लावल्याचा आरोप मुलाविरुद्ध वडिलांनी केलेला आहे.
हेही वाचा -
- Chief Justice Of Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती
- Threat To HC Judges : उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातील बँक खात्यात खंडणी मागितली
- High Court On Hateful Post : धार्मिक द्वेषपूर्ण साहित्याची लिंक व्हाट्सअपवर स्टेटसला ठेवाल तरी काही खैर नाही, उच्च न्यायालयाची तंबी