मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारात अनियमिततेमुळे आलेल्या लँडिंगला एचडीआयएल कंपनी जबाबदार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारात अनियमितता आढळल्याने रिझर्व्ह बँकेने मंगळवारपासून 35 अ अंतर्गत कारवाई करत या बँकेचे कामकाज रोखले आहे.
या कारवाईमुळे बॅंकेचे खातेदार आणि कर्मचारी हवालदिल झाले आहेत. याबाबत बुधवारी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भांडुप येथील मध्यवर्ती कार्यालयात बँकेचे अधिकारी, रिझर्व बँकेचे अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन बँकेच्या तोट्याला एचडीआयएल या कंपनीला जबाबदार धरले आहे.
या बँकेची 25 ते 35 टक्के लँडिंग ही एचडीआयएल आणि संबंधित बेनामिंना गेल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या बँकेच्या 9 लाख 15 हजार खातेधारकांच्या 8 लाख ते 1 लाखाच्या जवळपास ठेवी आहेत. तसेच 137 शाखांपैकी 125 पक्षाच्या शाखेंचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे 8 लाख खातेदारांना वाचवणे आणि 125 शाखांचा व्यवसाय सुरू ठेवणे गरजेचे आहे. रिझर्व बॅंकेने १ वेगळा सेल बनवून जे मोठे कर्जदार आहेत त्यांच्याकडून वसुलीचे काम करावे. तसेच वेगळा सेल बनवून सीबीआय अथवा इतर संस्थांच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई करण्याचा सल्ला किरीट सोमय्या यांनी दिला आहे.