ETV Bharat / state

अन्वय नाईक कुटुंबाशी असलेल्या संबंधाचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा - किरीट सोमैय्या - ठाकरे वायकर यांचे अन्वय नाईक कुटुंबाशी जमीन व्यवहार

अन्वय नाईक यांच्याशी ठाकरे आणि वायकर यांचे जागेचे व्यवहार झाले असल्याचे कालच भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी उघड केले होते. आजदेखील याबाबत पत्रकार परिषद घेत सोमैय्या यांनी ठाकरे, वायकर यांचे नाईक कुटुंबातील जमीन व्यवहाराचे एकवीस 7/12 उतारे समोर आले आहेत, याबाबत माहिती दिली.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Nov 12, 2020, 5:04 PM IST

Updated : Nov 12, 2020, 5:33 PM IST

मुंबई - अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात वाद-विवाद पाहायला मिळत आहेत. अन्वय नाईक यांच्याशी ठाकरे आणि वायकर यांचे जागेचे व्यवहार झाले असल्याचे कालच भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी उघड केले होते. आजदेखील याबाबत पत्रकार परिषद घेत सोमैय्या यांनी ठाकरे, वायकर यांचे नाईक कुटुंबातील जमीन व्यवहाराचे एकवीस 7/12 उतारे समोर आले आहेत, याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

भाजप नेते किरीट सोमैय्या पत्रकार परिषद
गैरव्यवहार झाले असण्याची शक्यता
अर्णव गोस्वामी यांना अन्वय नाईक यांचा आत्महत्येप्रकरणी मुद्दाम अटक केली. कारण नाईक परिवार आणि ठाकरे परिवार यांच्यात आर्थिक संबंध आहेत, हे अप्रत्यक्ष गैरव्यवहार आहेत, असे सोमैय्या म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाईक व ठाकरे तसेच वायकर यांच्याशी झालेल्या जमीन व्यवहाराबाबत खुलासा करावा, अशी मागणी सोमैय्या यांनी केली आहे.
जमीन व्यवहाराचे एकवीस 7/12 उतारे
ठाकरे, वायकर यांचे अन्वय नाईक कुटुंबामधील जमीन व्यवहाराचे एकवीस 7/12 उतारे समोर आले आहेत. कोर्लई (ता. मुरुड, जि रायगड) येथील अन्वय नाईक, अक्षता नाईक, आज्ञा नाईक यांनी 21 भूभाग रश्मी उद्धव ठाकरे व मनिषा रवींद्र वायकर यांना विकले असल्याचे कागदपत्रांवरून दिसते. यातील काही जमीन वन, खासगी वने असल्याचे वाटते. या जमिनीस वनेतर वापरास बंदी आहे. वनेतर वापरासाठी केंद्र शासनाची पूर्व परवानगी आवश्यक आहे. या जमीन व्यवहारात रश्मी उद्धव ठाकरे व मनिषा रवींद्र वायकर यांची नावे आहेत. ह्या प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री यांनी माहिती द्यावी, असे सोमैय्या यांनी म्हटले आहे.
ठाकरे व वायकर यांचे आर्थिक व व्यावसायिक संबंध कसे?
रश्मी ठाकरे व मनीषा वायकर कुटुंबीयांचे एका जागेमध्ये नाव समोर आले आहे. रवींद्र वायकर हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मंत्रीही होते. मनिषा ह्या रवींद्र वायकरांच्या पत्नी आहेत. रश्मी उद्धव ठाकरे व मनिषा वायकर यांचे जागा घेण्यापर्यंत संबंध कधी आले. जर संबंध असतील तर आर्थिक आहेत की, व्यावसायिक आहेत, असा प्रश्न सोमैय्या यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुरुड जागेच्या व्यवहारांबाबत किरीट सोमैय्या यांनी काही प्रश्न विचारत खुलासा करण्याचे आव्हान केले आहे. यामध्ये रश्मी ठाकरे व मनिषा वायकर यांचा जमीन घेण्यामागचा उद्देश काय? नाईक परिवाराचे उद्धव ठाकरे परिवाराशी एवढे घनिष्ठ संबंध, व्यक्तिगत संबंध, आर्थिक संबंध, व्यावसायिक याबाबत स्पष्टता येणे गरजेचे आहे. या जमिनी शेती करण्यासाठी घेण्यात आल्या, शेती व्यवसायसाठी, जमीन व्यवसायासाठी की, गुंतवणुकीसाठी? अशाप्रकारचे आणखीन किती जमीन व्यवहार ठाकरे परिवाराचे झाले आहेत? असे प्रश्न आज पत्रकार परिषदेत सोमैय्या यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत.

Last Updated : Nov 12, 2020, 5:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.