ETV Bharat / state

'उद्धवा अजब तुझे सरकार'; भाजपचा मुख्यमंत्र्यांना टोला - कोरेगाव भीमा प्रकरण तपास न्यूज

कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तपासावरुन राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. तपास कोणाकडे द्यायचा याबाबात सरकारमध्ये संभ्रम आहे. भाजपने ही संधी उचलून धरत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केले आहे. 'उद्धवा अजब तुझे सरकार', असा मिश्किल टोला भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

Kirit Somaiya
किरीट सोमैया
author img

By

Published : Feb 14, 2020, 11:02 PM IST

मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तापासाबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये ठिणगी पडली आहे. भाजपने ही संधी उचलून धरत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केले आहे. 'उद्धवा अजब तुझे सरकार', असा मिश्किल टोला भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

'उद्धवा अजब तुझे सरकार'

कोरेगाव भीमा प्रकरणी 22 डिसेंबरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसआयटी(विशेष तपास पथक)ची मागणी केली होती. त्यानंतर 23 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांवर तपासासाठी दबाव आणला असल्याचे बोलले जात गेले. 24 जानेवारीला शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात एक पत्रही लिहले. त्यानंतर 25 जानेवारीला या प्रकरणाचा तपास एनआयए(राष्ट्रीय तपास यंत्रणा)कडे देण्यात आला.

हेही वाचा - भूमिका बदलून काही लोक आज सत्तेत, राज ठाकरेंचा शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोला

याला महाविकास आघाडी सरकारने कडाडून विरोध केला. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण एनआयएला दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले. तपास कुणाकडे राहील याबाबत हे प्रकरण पुण्याच्या न्यायालयात गेले. दरम्यान 13 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांनी कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास राज्य पोलिसांकडून एनआयएकडे वर्ग करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या सरकारमध्येच संभ्रम आहे, असे किरीट सोमैया यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.