मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या महिन्यात लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, कोरोनाच्या संसर्गाच्या काळात दिल्लीतील निजामुद्दीन येथे मोठा धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर निशाणा साधला होता त्यानंतर आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख च्यावर पलटवार केला आहे.
-
अनिल देशमुख जवाब दो
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
कितने तबलीगी गायब है, हिसाब दो
महाराष्ट्रातून १५०० तबलीगी दिल्ली गेले
CM म्हणतात सगळे सापडले
गृहमंत्री सांगतात ५० गायब
आरोग्य मंत्री म्हणाले १०० गायब
पोलीस म्हणते १५० फरार
त्यांचा मुळे महाराष्ट्राचे किती नुकसान झाले
त्यांना शोधण्यात एवढा उशीर का? pic.twitter.com/174RsiBRhy
">अनिल देशमुख जवाब दो
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 9, 2020
कितने तबलीगी गायब है, हिसाब दो
महाराष्ट्रातून १५०० तबलीगी दिल्ली गेले
CM म्हणतात सगळे सापडले
गृहमंत्री सांगतात ५० गायब
आरोग्य मंत्री म्हणाले १०० गायब
पोलीस म्हणते १५० फरार
त्यांचा मुळे महाराष्ट्राचे किती नुकसान झाले
त्यांना शोधण्यात एवढा उशीर का? pic.twitter.com/174RsiBRhyअनिल देशमुख जवाब दो
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 9, 2020
कितने तबलीगी गायब है, हिसाब दो
महाराष्ट्रातून १५०० तबलीगी दिल्ली गेले
CM म्हणतात सगळे सापडले
गृहमंत्री सांगतात ५० गायब
आरोग्य मंत्री म्हणाले १०० गायब
पोलीस म्हणते १५० फरार
त्यांचा मुळे महाराष्ट्राचे किती नुकसान झाले
त्यांना शोधण्यात एवढा उशीर का? pic.twitter.com/174RsiBRhy
अनिल देशमुख उत्तर द्या, किती तबलिगी गायब आहेत? महाराष्ट्रातून 1 हजार 500 तबलिगी दिल्लीत गेले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात सगळे तबलिगी सापडले आहेत. तर गृहमंत्री म्हणतात 50 लोक फरार आहेत. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगतात की, तबलिगीचे 100 लोक अद्याप गायब आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे किती नुकसान झाले आहे? त्यांना शोधण्यात एवढा उशीर का? असे सवाल भाजप नेते सोमय्या यांनी विचारले आहेत.
- काय म्हणाले होते गृहमंत्री अनिल देशमुख -
मुंबईतील वसई येथे 15 आणि 16 एप्रिलला जवळपास 50 हजार तबलिगी एकत्र जमणार होते. मात्र, राज्य सरकार आणि गृह विभागाने परवानगी नाकारली. पण, केंद्र सरकारने दिल्लीतील कार्यक्रमाला परवानगी कशी दिली ? राज्यात आणि देशात जो कोरोनाचा प्रादुर्भाव झाला, त्यास केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि दिल्ली पोलीस आयुक्तांनी या विषयावर बोलायचं का टाळलं? डोवाल यांना भेटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मौलाना साद कुठे गायब झाले, मौलाना आता कुठे आहेत? असे सवाल देशमुख यांनी उपस्थित केले होते.