ETV Bharat / state

Mallikarjun Kharge Mumbai Visit : काँग्रेस अध्यक्ष खरगे मुंबई दौऱ्यावर, पालिका निवडणुकीचा घेणार आढावा - मल्लिकार्जुन खरगे मुंबई दौऱ्यावर

काँग्रेसचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) हे महिन्याभरात मुंबईत महानगरपालिका निवडणुकी संदर्भात (mumbai municipal election) आढावा बैठक घेणार आहेत. (Mallikarjun Kharge mumbai visit). तसेच काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेत दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याचा देखील पुनर्विचार केला जाणार आहे.

खरगे येणार मुंबई दौऱ्यावर
खरगे येणार मुंबई दौऱ्यावर
author img

By

Published : Oct 27, 2022, 7:28 PM IST

मुंबई: काँग्रेसचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) हे महिन्याभरात मुंबईत महानगरपालिका निवडणुकी संदर्भात (mumbai municipal election) आढावा बैठक घेणार आहेत. (Mallikarjun Kharge mumbai visit). तसेच काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेत दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याचा देखील पुनर्विचार केला जाणार आहे.

निवडणुकीच्या कामांचा आढावा: मुंबई महानगरपालिका निवडणुका कुठल्याही क्षणी घोषित होऊ शकतात. अशात पालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी एकीकडे भाजप - शिंदे गट युती तर दुसरी कडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांनी कंबर कसली असून ही निवडणूक फार अटीतटीची होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसने निवडणुकीसाठी वर्षभरापासूनच तयारीला सुरुवात केली असून पालिकेतील शिवसेनेचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी त्यांनी भाजपला सुद्धा सहकार्य केले होते. परंतु आत्ता ज्या पद्धतीने राज्यात नाट्यमय सत्तांतर झालेल आहे ते पाहता व सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या निवडणुकीत मुंबई काँग्रेस ने स्वबळाचा जरी नारा दिला असला तरी हे चित्र बदलून काँग्रेस बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडी सोबत या निवडणुका लढवण्याची शक्यता आहे. यासाठी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे लवकरच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या कामांचा आढावा घेणार आहेत. येत्या महिनाभरात खरगे मुंबई दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.

ठाकरे गट विभागल्याने समीकरणे बदलणार: २०१७ साली मुंबई महापालिका निवडणुकीत २२८ वॉर्ड पैकी शिवसेनेला ८४, भाजप ८२, काँग्रेस ३१, राष्ट्रवादी काँग्रेस ९, मनसे ७ आणि इतर उमेदवारांना १४ जागांवर विजय मिळाला होता. ८४ जागांसह शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला होता तर काँग्रेसने ३१ जागा घेतल्याने काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. परंतु यंदा मुंबई काँग्रेसने अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणामध्ये प्रचाराला सुरुवात केली असून आतापासूनच सर्वाधिक जागा घेण्यासाठी स्वबळाचा नारा देत कंबर कसली आहे. परंतु राज्यात झालेल्या नाट्यमसत्तांत्रानंतर ठाकरे गट विभागला गेला असून याचा फायदा स्थानिक स्तरावर काँग्रेसला होऊ शकतो. त्या अनुषंगाने सुद्धा मतदारसंघांची चाचपणी सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

दिल्लीतील भेटीत चर्चा: मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखालील एका शिष्टमंडळाने नुकतीच मल्लिकार्जुन खरगे यांची दिल्लीत भेट घेतली होती. भाई जगताप यांनी खरगेंना मुंबई भेटीचे निमंत्रण दिले होते. या भेटीदरम्यानच खरगे यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील नेते मंडळींशी चर्चा केली. विशेष करून मुंबई महानगरपालिका निवडणुकी संदर्भात विविध अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाली. यामध्ये स्वतः खरगे यांनी सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले. ही निवडणूक स्वतंत्र लढली तर काय फायदा होऊ शकतो किंवा काय तोटा होऊ शकतो, तसेच सध्या राज्यात बदललेल्या समीकरणामुळे त्याचा कसा परिणाम बघायला भेटेल असेही त्यांनी विचारल्याची माहिती आहे. मुंबईतील सर्वच वॉर्ड मध्ये निवडणूक लढवायची असल्यास किती नगरसेवक इच्छुक आहेत व मागच्या निवडणुकीत दुसऱ्या नंबर वर राहिलेले काँग्रेसचे उमेदवार यंदा निवडून आणण्यासाठी कशा पद्धतीची तयारी करावी लागेल, या सर्व गोष्टींची खलबते दिल्लीत झाली असून त्या अनुषंगाने लवकरच मल्लिकार्जुन खरगे हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.