ETV Bharat / state

Kesarkar Office in BMC : शिंदे गट- भाजपात शह काटशहाचे राजकारण, मंगल प्रभात लोढांनंतर आता शिंदे गटाच्या 'या' मंत्र्याचं पालिकेत दालन - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका

Kesarkar Office in BMC : मागील काही दिवसांपासून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन चांगलीच चढाओढ सुरू असताना मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढांनी महापालिका मुख्यालयात कार्यालय स्थापन केलं होतं. यानंतर आता शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनीही पालिकेत आपलं कार्यालय सुरु केलय.

Kesarkar Office in BMC
Kesarkar Office in BMC
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 1:03 PM IST

मुंबई Kesarkar Office in BMC : मागील काही दिवसांपासून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन चांगलीच चढाओढ सुरू असल्याचं बघायला मिळतंय. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी पालिका मुख्यालयात त्यांचं कार्यालय स्थापन केलं होतं. यावरुन विरोधकांची टोलेबाजी सुरू असतांनाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेनाही बृहन्मुंबई महानगरपालिकेत सक्रिय झालीय. त्यामुळं आता राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय. तसंच या मुद्द्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका रंगण्याची शक्यता आहे.

लोढांनंतर आता केसरकरांचं पालिकेत कार्यालय : मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिका मुख्यालयात त्यांचं कार्यालय स्थापन केल्यानंतर, आता मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना देखील पालिका मुख्यालयात कार्यालय देण्यात आलंय. तसंच मुंबईकरांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी केसरकर हे प्रत्येक बुधवारी महापालिकेच्या कार्यालयात उपस्थित असतील, असं सांगण्यात आलंय.

महापालिकेत विरोधी पक्षांना अद्यापही नो-एन्ट्री : मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिकेवर लक्ष केंद्रित केल्याचं निदर्शनास येतंय. तसंच विविध विषयांवर मुख्यमंत्री शिंदे हे पालिका प्रशासनाला सूचना करत असतात. त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू असते. दीपक केसरकर यांना पालिकेत आणून शिवसेना शिंदे गटानंही पालिका प्रशासनावरील पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केल्याच्या चर्चा रंगत आहेत. सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि भाजपनं पालिकेत मंत्र्यांची कार्यालयं थाटून पालिकेच्या मुख्यालयात शिरकाव केलाय. या मंत्र्यांच्या दालनामुळं माजी नगरसेवकांना पालिकेचे दरवाजे खुले झाले आहेत. तर, दुसरीकडं विरोधी पक्षांना मात्र पालिकेचे दरवाजे बंदच राहणार आहेत.

प्रत्येक बुधवारी लावणार महानगरपालिकेत हजेरी : यासंदर्भात पालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरातील सर्व नागरिकांनी शासकीय योजना, विकास कामे, यांच्याबाबत सूचना तसेच इतर समस्या असल्यास 4 ऑक्टोबर रोजी त्याबाबतचं निवेदन अथवा लेखी अर्जासह उपस्थित रहावे. नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विषयासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसंच इतर विषयांसाठी महानगरपालिका मुख्यालयात उपस्थित राहता येईल. दीपक केसरकर दर आठवड्याच्या प्रत्येक बुधवारी दुपारी एक ते चार या वेळेत पालिका मुख्यालयात उपस्थित असतील. मुख्यालयातील पहिल्या मजल्यावरील कार्यालयात ते नागरिकांशी संवाद साधतील, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आलीय.

पक्षांची कार्यालयं बंद असाताना नेत्यांची दालनं : दरम्यान, एकीकडं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका प्रलंबित असल्यानं या निवडणुका लवकरात लवकर घेण्याची मागणी ठाकरे गट करत आहे. तर, दुसरीकडं पालिकेतील पक्षांची कार्यालय बंद असताना आता मंत्र्यांनी तिथं दालन सुरू करण्यास सुरुवात केलीय. तसंच सध्या पालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानं 'लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींची आवश्यकता असते' असं कारण देत भाजपनं मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासाठी पालिका मुख्यालयात यापूर्वीच कार्यालय सुरू केलंय. लोढा यांनी पालिकेत कार्यालय सुरू केल्यानंतर विरोधकांनी प्रचंड टीका केली. मात्र, त्याचा काही परिणाम झाला नाही. तसंच आता लोढांच्या पाठोपाठ केसरकरांनीही पालिकेत एन्ट्री घेतल्यानं विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. Aditya Thackeray On Mangal Prabhat Lodha : मुंबईच्या विकासासाठी हुकमशाही धोक्याची, आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका
  2. Hanging Garden : ब्रिटिशकालीन जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी 389 झाडांची कत्तल, रहिवाशांनी विरोध करताच पालकमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश
  3. Monsoon session 2023 : महापालिका मुख्यालयातील मंत्र्यांच्या कार्यालयावरून विधानसभेत रणकंदन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.