ETV Bharat / state

Mumbai suicide : धक्कादायक! केईएम रुग्णालयाच्या शिकाऊ डॉक्टराने केली आत्महत्या - Kem Hospital

मुंबईतील केईएम रूग्णालयाच्या डॉक्टरबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. केईएम रुग्णालयात शिकणाऱ्या एका डॉक्टरने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. 24 वर्षीय आदिनाथ पाटीलने शिवडीच्या टीबी रूग्णालयात रात्री इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Mumbai suicide
शिकाऊ डॉक्टराने केली आत्महत्या
author img

By

Published : Jul 31, 2023, 9:56 PM IST

मुंबई : शिवडी टीबी हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईतील परळ येथील प्रसिद्ध अशा केईएम रुग्णालयात शिकणाऱ्या एका डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. आदिनाथ पाटील असे आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टराचे नाव आहे. आज सकाळी 8.30 वाजता टीबी हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या रेस्ट रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आदिनाथ आढळून आला. त्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. आदिनाथ पाटील हा मूळचा जळगावचा असून तो एमडी मेडिसीनचे वैद्यकीय शिक्षण घेत होता.

रेस्ट रूममध्ये आदिनाथ बेशुद्ध अवस्थेत : वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव निंबाळकर यांनी सांगितले की, शिवडी येथील टीबी रुग्णालयात केईएम रुग्णालयासाठी दोन राखीव वार्ड आहेत. डॉक्टरांसाठी असलेल्या रेस्ट रूममध्ये आदिनाथ बेशुद्ध अवस्थेत आढळल्यानंतर त्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. तर तपासणीत आदिनाथ पाटील याने इंजेक्शन घेतले असल्याचे निष्पन्न झाले आहे. रफी किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

इंजेक्शन घेऊन जीवन संपवले : केईएम रुग्णालयाच्या शिकाऊ डॉक्टराने केलेल्या आत्महत्येमागील कारण अद्याप रफी किडवाई मार्ग पोलिसांना समजले नाही. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवडी येथील टीबी हॉस्पिटलमध्ये एका २४ वर्षीय डॉक्टरने इंजेक्शन घेऊन जीवन संपवले आहे. MD मेडिसिन्सच्या प्रथम वर्षात आदिनाथ होता. डॉक्टर आदिनाथ पाटील यांची ड्युटी शिवडी येथील टीबी रुग्णालयात लागली होती. 24 वर्षीय डॉक्टरकीचे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आदिनाथ पाटील याने इंजेक्शन टोचून आयुष्य संपवले आहे. तर २४ वर्षीय डॉक्टरने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा -

  1. Pune Crime News : सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नीसह पुतण्याचा केला खून, गोळी झाडून केली आत्महत्या
  2. Married Couple Suicide In Kolhapur: प्रेमविवाह केलेल्या नवदाम्पत्याची सात महिन्यात आत्महत्या; घटनेपूर्वी भावाला पाठविले लोकेशन
  3. Accused Suicide In Lockup : कोर्टात हजर करण्यापूर्वीच बोरिवली लॉकअपमध्ये आरोपीची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.