ETV Bharat / state

KCR Maharashtra Visit: बीआरएस ही कुणाची बी टीम नसून शेतकऱ्यांची टीम -केसीआर - केसीआर विठ्ठल दर्शन

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे. त्यानंतर दुपारी तुळजाभवानी मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

KCR Maharashtra Visit
केसीआर आज पंढरपुरात
author img

By

Published : Jun 27, 2023, 7:15 AM IST

Updated : Jun 27, 2023, 1:12 PM IST

केसीआर यांचा पंढरपूर दौरा

पंढरपूर: तेलगणांचे मुख्यमंत्री के. सी. आर यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके यांनी अनेक कार्यकर्त्यांसह बीआरएसमध्ये प्रवेश घेतला आहे. सत्ता आल्यास भगीरथचे पाणी हे मंगळवेढ्यात आणण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्येबाबत केसीआर यांनी आपली भूमिका मांडायला सुरुवात केली आहे.

  • Watch Live: Leaders from various parties in Maharashtra joining the BRS Party in the presence of Party President, CM Sri KCR, at Solapur. https://t.co/DjJRZpS8cn

    — BRS Party (@BRSparty) June 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

डिजीटल इंडिया महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी का नाही, मेक इन इंडिया आहे तर चायना बाजार का असतो? वीज कंपन्यांचे खासगीकरण का? बीआरएस ही कुणाची बी टीम नसून शेतकऱ्यांची टीम आहे. खासगीकरूनही शेतकऱ्यांना वीज का मिळत नाही? तेलंगणासारख्या योजना महाराष्ट्रात का नाही, याचा जाब शेतकऱ्यांनी सरकारला विचारावा, असे आवाहन केसीआर यांनी जनतेला केले आहे. शेतकऱ्यांसाठी वेगळ्या योजना तेलंगणा सरकारने दिल्या आहेत. मात्र, इतर राजकीय पक्ष उलटसुलट विधाने करत असल्याचा आरोप केसीआर यांनी केला आहे.

प्रत्येक एकरला पाणी देता येते- देशाला मोठ्या क्रांतीला सामोरे जावे लागणार आहे. महाराष्ट्रात कोणत्याही पक्षाने विकास केला नाही. योजना दिल्याने राज्याचे दिवाळे निघणार नाही. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची दिवाळी होईल. सत्ता जाते-येते. पण विकास महत्त्वाचा आहे. मराठी बोलू शकत नाही पण समजते. शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत असल्याने इतर पक्षांना भीती वाटत आहे. बीआरएस ही एका राज्यापुरती मर्यादित नाही. केंद्र व राज्य सरकारची नीती चांगली असेल तर प्रत्येक एकरला पाणी देता येते. येथील सरकारमध्ये इच्छाशक्ती नाही. संभाजीनगर, सोलापूर, अकोलामध्ये आठ दिवसातून एकदा पाणी येते. कशामुळे पाणी कपात होते. देशाची जलनीती पश्चिम बंगालमध्ये फेकून दिली पाहिजे. पाणी असूनही आपण का वंचित आहोत, असा प्रश्न केसीआर यांनी उपस्थित केला आहे.

तुळजाभवनी मंदिरात प्रार्थना करणार- तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (केसीआर) हे त्यांचे मंत्रिमंडळ सहकाऱ्यांसह पंढपुरात 600 वाहनांच्या ताफ्यासह दाखल झाले आहेत. चंद्रशेखर राव यांनी आज विठ्ठलाच्या मंदिरात व्हीआयपी दर्शन घेतले आहे. हेलिकॉप्टरमधून पालखीवर पाकळ्यांचा वर्षाव करण्याची केसीआर यांनी प्रशासनाकडे परवानगी मागितली. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे. पंढपुरहून ते उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील तुळजाभवनी मंदिरात प्रार्थना करणार असल्याचे बीआरएस नेते धोंडगे यांनी सांगितले.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे आज राष्ट्रवादीतून बाहेर पडत के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये शेकडो समर्थकांसह प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांच्या सरकोली या निवासस्थानी सकाळी दहा वाजता कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे. भालके यांच्याकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे स्नेहभोजनही करणार आहेत. केसीआर यांच्या वाहनासोबत जवळपास 600 वाहने असल्याने सोलापूरमध्ये पोलिसांना वाहतूक नियंत्रण करताना दमछाक झाली. सोलापुरात एक किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. पंढरपुरातदेखील तेच दृश्य पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

पुुष्पवृष्टीला परवानगी नाकारल्याने बीआरएस नाराज- सकाळी चंद्रशेखर राव विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या फौजफाट्यातील मंत्री, पदाधिकारी व नेत्यांना दर्शनाची परवानगी दिली नाही. यापूर्वीच हिंदूराष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केसीआर यांच्या व्हीआयपी दर्शनाला विरोध केला आहे. त्यामुळे संतापलेल्या बीआरएसचे प्रदेश अध्यक्ष माणिक कदम यांनी सर्वच नेत्यांचे व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी केली आहे. बीआरएस पक्षाला दिंडीतील वारकऱ्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याची इच्छा आहे. त्यासाठी पक्षाने जिल्हा प्रशासनाकडे केलेली मागणी फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे माणिक कदम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ऐन वारीत असताना केसीआर राजकीय शक्तीप्रदर्शन करत आहेत, असा आरोप हिंदुराष्ट्र सेनेचे सोलापूर शहर अध्यक्ष रवी गोने यांनी केला आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपुरात पायी चालत येतात. मात्र, अशा वेळी मुख्यमंत्री केसीआर यांना व्हीआयपी दर्शन दिल्याने वारकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे हिंदुराष्ट्र सेनेने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

केसीआर यांच्या ताफ्यात कोण आहे?

  1. 16 कॅबिनेट मंत्री
  2. 1o3 आमदार
  3. 7 खासदार
  4. 30 विधानपरिषदेचे आमदार
  5. 600 एसयूव्ही वाहने

राष्ट्रवादीत चिंता- केसीआर यांच्या पक्षात राष्ट्रवादीचे अनेक नेते प्रवेश करत असल्याने राष्ट्रवादीच्या गोटात चिंता आहे. बीआरएस पक्षाचे अर्थमंत्री हरीश राव, तेलंगणा एक्साईज अँड स्पोर्ट्स टुरिझम मंत्री श्रीनिवास गौड, तेलंगणाचे ऊर्जामंत्री जगदीश्वर रेड्डी यांनी सोमवारी सायंकाळी भाजपचे माजी खासदार लिंगराज वल्याळ यांच्या निवासस्थानी जाऊन नागेश वल्याळ यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादुल यांची भेट मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी घेतली.

हेही वाचा-

  1. KCR Maharashtra visit : राजकीय समीकरणे बदलण्याच्या मार्गावर; के चंद्रशेखर राव यांनी घेतली काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादुल यांची भेट
  2. Sugar Factory Politics : साखरपट्ट्यात केसीआर यांची एन्ट्री; काँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का देणार?

KCR in Solapur : वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यासाठी केसीआर यांना परवानगी नाही, केसीआर यांची जिल्हा प्रशासनावर नाराजी

Last Updated : Jun 27, 2023, 1:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.