ETV Bharat / state

Narendra dabholkar : मुंबईत नरेंद्र दाभोळकरांवर आधारित कसोटी विवेकाची कला प्रदर्शन, अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या हस्ते उद्घाटन

author img

By

Published : Oct 28, 2022, 7:11 PM IST

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची १ नोव्हेंबर २०२२ ला ७७ वी जयंती आहे. दाभोळरांच्या जीवनावर आधारित त्यांचे व्यक्तिमत्त्व, कार्य आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, "कसोटी विवेकाची" या कला ( kasoti vivekachi art exhibition ) प्रदर्शनाद्वारे जे जे स्कूल ऑफ आर्टच्या (J.J.School of art Mumbai  ) विद्यार्थ्यांनी अनोखे प्रयत्न केले आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते नसीरूद्दीन शाह यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर ऋणानुबंध हॉल येथे करण्यात आले.

Inauguration by Naseeruddin Shah in mumbai
कसोटी विवेकाची या कला प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते नसिरुद्दीन शहा यांच्या हस्ते संपन्न.

मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर ( Narendra dabholkar ) यांची हत्या होऊन ९ वर्षाचा कालावधी उलटल्यानंतरही अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची १ नोव्हेंबर २०२२ ला ७७ वी जयंती आहे. दाभोळरांच्या जीवनावर आधारित त्यांचे व्यक्तिमत्त्व, कार्य आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, "कसोटी विवेकाची" या कला ( kasoti vivekachi art exhibition ) प्रदर्शनाद्वारे जे जे स्कूल ऑफ आर्टच्या (J.J.School of art Mumbai ) विद्यार्थ्यांनी अनोखे प्रयत्न केले आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते नसीरूद्दीन शाह यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर ऋणानुबंध हॉल येथे करण्यात आले.

Narendra dabholkar
कसोटी विवेकाची या कला प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी अभिनेते नसिरुद्दीन शाह बोलताना

दाभोळकरांचे कार्य व विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश - डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या होऊन ९ वर्ष झाली. आता सध्या दाभोळकर खून खटला एवढ्या पुरता दाभोळकरांविषयीचं मुख्य माध्यमातून कव्हरेज मर्यादित आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या पाठोपाठ गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्याही हत्या झाल्या. दाभोलकरांविषयी बोलायचं तर त्यांच्या मृत्यूनंतरही अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. ते दूर व्हावेत दाभोळकर व्यक्ती, कार्य आणि विचार लोकांपर्यंत विशेषता तरुणांपर्यंत पोहोचावेत यासाठी दाभोळकरांचे अनुयायी एक नवीन उपक्रम घेऊन आले आहेत.

जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांचे अनोखे प्रयत्न - "कसोटी विवेकाची" या प्रदर्शनात जे जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी आपली अभिव्यक्ती वेगवेगळ्या माध्यमातून सादर केली आहे. २३ विद्यार्थ्यांनी २९ प्रकारे ही अभिव्यक्ती सादर केली असून, हे कला प्रदर्शन यशवंतराव चव्हाण सेंटर ऋणानुबंध हॉल, मुंबई येथे भरवले गेले असून, त्याचे उद्घाटन आज प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. दाभोळकर यांच्या पत्नी डॉक्टर शैला दाभोळकर, खासदार सुप्रिया सुळे आणि जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठता आणि महाराष्ट्राचे प्रभारी कला संचालक प्राध्यापक विश्वनाथ साबळे उपस्थित होते.

अंधविश्वास सगळीकडे आहे - अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी दाभोळकर यांच्या जीवनाविषयी बरीचशी माहिती जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध अभिव्यक्ती मधून जाणून घेतली. याप्रसंगी बोलताना नसरुद्दीन शाह म्हणाले की, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या जाण्याने त्यांची पावले मिटणार नाहीत, तर ती अजून प्रखर होतील. अंधविश्वास हा फक्त आपल्या देशातच नाहीत तर आपल्या बाजूच्या शेजारील देशांत सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. हिजाब विरोधात सुद्धा आंदोलन सुरू आहे. मी भाग्यवान समजतो की अश्या ठिकाणी जन्म घेतला जिथे दाभोळकरांसारख्या व्यक्ती आहेत. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्याकडून शिकण्यासारखे खूप आहे. अंधविश्वासाला आपण दूर लोटलं पाहिजे असेही ते म्हणाले.हे कला प्रदर्शन २८ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत हे सर्वांसाठी खुले असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.