मुंबई- आयआयटीमार्फत घेण्यात आलेल्या आयआटी- जेईई अॅडव्हान्स-2019 च्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता हा विद्यार्थी देशात पहिला आला आहे. सतरा वर्षीय कार्तिकेय याने ३६० पैकी ३३७ गुण मिळवले आहेत. या परीक्षेत अलहाबादचा हिमांशू सिंह याने दुसरा तर नवी दिल्लीतील अर्चित बुबना याने तिसरा क्रमांक मिळवला आहे.
कार्तिकेय याने JEE Main-२०१९ मध्ये १०० NTA ईतके गुण मिळवले हाते. JEE Main मध्ये त्याचा रँक देशात १८ होता. कार्तिकेय हा मुळचा चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील आहे. पूर्वतयारीसाठी त्याने मुंबईत अॅलन कोहीनूर या संस्थेची निवड केली होती.
आवडीने आणि तणाव न घेता अभ्यास करण्याचा सल्ला कार्तिकेयने दिला आहे. तसेच दोन वर्ष स्मार्टफोन पासून दूर राहिल्याचेही त्याने सांगिले. कार्तिकेयला आयआयटी मुंबईत कॉम्प्यूटर सायन्सला प्रवेश घ्यायाचा आहे.
निकाल जाहीर झाल्यानतर विद्यार्थ्यांना काउंसिलिंगसाठी अर्ज करता येईल. जाँईंट सीट अॅलोकेशन अॅथॉरीटीच्या काउंसिलिंगच्या आधारावरच कोणत्या विद्यार्थ्याला आयआयटीत किंवा एनआयटीत प्रवेश मिळेल हे ठरणार आहे. ही परीक्षा २७ मे रोजी ऑनलाईन पद्धतीने देशातील १५५ शहरांतील परीक्षा केंद्रावर आयोजित करण्यात आली होती. या परिक्षेत गुणवत्ता यादीत येणारे विद्यार्थी देशातील प्रतिष्ठित २३ आय आयटी संसथ्याच्या ११२७९ जागांवर प्रवेशासाठी अर्ज करु शकतात.
विद्यार्थी https://results.jeeadv.ac.in या संकेत स्थळावर निकाल बघू शकतात.