ETV Bharat / state

कंगनाने भाजपाला खूश करण्यासाठीच महाराष्ट्राची बदनामी केली - रोहित पवार

भाजपाला खूश करण्यासाठीच कंगनाने महाराष्ट्राची बदनामी केली असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच आता भाजपाला काय शिक्षा द्यायची ते आता राज्याची जनताच ठरवेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

kangana-defamed-maharashtra-to-please-bjp-said-rohit-pawar
'भाजपाला खूश करण्यासाठीच कंगनाने महाराष्ट्राची बदनामी केली'
author img

By

Published : Jan 4, 2021, 5:24 PM IST

मुंबई - भाजपाला खूश करण्यासाठीच महाराष्ट्राची बदनामी केल्याची कबुली देऊन महाराष्ट्रद्रोही भाजपाचा खरा चेहरा पुढे आणल्याबद्दल कंगना राणौतचे अभिनंदन करायला पाहिजे, असा मिश्किल टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कंगनाला लगावाला आहे. त्याबाबतचे ट्विट त्यांनी केले आहे. तसेच या देशद्रोहाबद्दल भाजपाला काय शिक्षा द्यायची ते आता राज्याची स्वाभिमानी जनताच ठरवेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

kangana-defamed-maharashtra-to-please-bjp-said-rohit-pawar
रोहित पवार यांचे ट्विट

काय आहे प्रकरण -

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि कंगना राणौत यांच्यात वाद सुरू आहे. दरम्यान, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेना प्रवेशानंतर खार येथे पावणे चार कोटींचे कार्यालय खरेदी केले आहे, असा आरोप कंगनाने केला होता. त्यानंतर काल उर्मिला मातोंडकर यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत या आरोपाचे खंडन केले. तसेच मी कार्यालय खरेदीचे सर्व कागदपत्रे दाखवायला तयार आहे. त्याबदल्यात कंगनाने ड्रग्ज घेणाऱ्याची यादी एनसीबीला द्यावी, असे आव्हान दिले होते. त्यानंतर कंगनानेही मी मेहनतीने घर बांधले असून ते कॉंग्रेस तोडत आहे. तसेच भाजपाला खूश करून मला काहीही फायदा झाला नाही. उलट माझ्यावर केसेस दाखल झाल्या, असा खूलासा केला. पुढे लिहिताना कदाचित मी तुमच्या एवढी समजदार असती तर कॉंग्रेसला खूश केले असते, असेही तिने म्हटले होते. याच ट्विटचा आधार घेत आमदार रोहित पवार यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

हेही वाचा - 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सुनावणी पुढे ढकलली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.