ETV Bharat / state

कामाठीपुरातील गणेशोत्सव मंडळाने हुतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली - श्रद्धांजली

पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना कामाठीपुरा येथील अखिल कामाठीपुरा सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाने १५ फुटाचा हुतात्मा स्तंभ उभारुन, तसेच बाप्पाला निरोप देताना कोणतेही वाद्य न वाजवता निरोप दिला.

हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहताना
author img

By

Published : Feb 19, 2019, 10:52 AM IST

मुंबई - पुलवामा दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना कामाठीपुरा येथील गणेशोत्सव मंडळाने श्रद्धांजली वाहिली. यावेळी कामाठीपुरा येथील अखिल कामाठीपुरा सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाने बाप्पाला कोणतेही वाद्य न वाजवता निरोप दिला.

हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहताना
undefined

काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. यात राखीव पोलीस दलाचे ४० पेक्षा जास्त जवानांना वीरमरण आले. या हल्ल्याविरोधात देशभर संतापाची लाट उसळली आहे. हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना मुंबईतील अखिल कामाठीपुरा सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. मंडळाकडून जवानांना श्रद्धांजली म्हणून १५ फुटाचा हुतात्मा स्तंभ बनवण्यात आला. पूर्ण कामाठीपुरात हा स्तंभ फिरवण्यात आला. यानंतर मंडळाने शांततेत तिरंगा खांद्यावर घेऊन गणपतीचे विसर्जन केले. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Intro:मुंबई
पुलवामा येथे झालेल्या हल्यात 40 पेक्षा जास्त जवानांना शहीद झाले. या हल्ल्यानंतर पूर्ण देशात हा संताप व्यक्त करण्यात आला. मुंबईतील अनेक ठिकाणी निषेध, बंद करण्यात आले. पण या हल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कामाठीपुरा येथील अखिल कामाठीपुरा सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळानी बाप्पाला निरोप हा कोणतेही वाद्य न वाजवाता दिला आहे.
Body:काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारने जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटके असल्याने बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात राखीव पोलीस दलाचे चाळीस हून अधिक जवान शहीद झाले. या हल्ल्याविरोधात देशभर संतापाची लाट उसळली आहे. 

हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मुंबईतील अखिल कामाठीपुरा सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळ एक अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. मंडळाकडून जवानांना श्रद्धांजली म्हणून 15 फुटाचे शहीद स्तंभ बनविण्यात आला आहे. शांततेत बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. पूर्ण कामाठीपुरात हे स्तंभ फिरवण्यात आले. हजारोच्या संख्येत नागरिक यावेळी सहभागी झाले होते. तिरंगा खांद्यावर घेऊन बाप्पाला निरोप देण्यात येत होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.