ETV Bharat / state

Rapper Rajesh Mungase : रॅपर राजेश मुंगासेला न्यायालयाने दिले अटकेपासून संरक्षण

author img

By

Published : Apr 12, 2023, 5:03 PM IST

महाराष्ट्र शासनावर रॅप सॉन्ग द्वारे टीका केल्या प्रकरणी रॅपर राजेश मुंगासे यांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. त्यांच्या वकिलांनी कल्याण येथील सत्र न्यायालयामध्ये त्यांना अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 25 एप्रिलला होणार आहे.

Rapper Rajesh Mungase
रॅपर राजेश मुंगासे

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या विरोधात राजेश मुंगासे यांनी ट्विटर खात्यावर रॅप डान्स आणि गाणे सादर केल्यामुळे त्यांच्यावर कथित रित्या शासनाची बदनामी करण्याचा आरोप लगावण्यात आला आहे. या संदर्भात त्यांनी सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता. दाखल केलेल्या अर्जावरून न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच सत्र न्यायालयाने याबाबतची सुनावणी 25 एप्रिल 2023 रोजी निश्चित केली आहे.

युवा सेनेच्या कार्यकर्त्याने नोंदवला गुन्हा : कल्याण मधील युवा सेनेच्या कार्यकर्त्या स्नेहल कांबळे यांनी 4 एप्रिल 2023 रोजी ट्विटरवर एक व्हिडिओ प्रसारित केला होता. हा व्हिडिओ रॅपर राजेश मुंगासे यांचा होता. या व्हिडिओवरून त्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. या व्हिडिओमुळे महाराष्ट्र शासनाची आणि शिंदे सरकारची बदनामी होते आहे, असं स्नेहल कांबळे यांनी या तक्रारीमध्ये नमूद केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम तसेच इतर कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला गेला. हा गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी चौकशीची चक्रे फिरवली. त्यानंतर राजेश मुंगासे यांनी कल्याण सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली.

'प्रत्येकाला शासनावर टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे' : या प्रकरणी राजेश मुंगासे यांना केव्हाही अटक होणार होती. त्यामुळेच त्यांचे वकील शुभम कहाते यांनी कल्याण येथील सत्र न्यायालयामध्ये राजेश मुंगासे यांना अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी त्यांनी न्यायालयात बाजू मांडली होती की, राज्यघटनेचे कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत आहे. तसेच शासनावर टीका करण्याचे स्वातंत्र्य हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत अधिकार आहे. त्यांनी आपला तोच हक्क बजावलेला आहे. त्यांनी गाण्यात शासनाच्या कुठल्याही मंत्र्याचे नाव घेतले नाही. तसेच कोणा पदाधिकाऱ्याला उद्देशून देखील त्यांनी हे गाणं गायलेलं नाही. त्यांनी राज्यघटनेचे कलम 19 अंतर्गत दिलेल्या अधिकाराचा वापर करतच हे गाणं म्हटलं असल्याचं राजेश मुंगासे यांच्या वकिलांनी नमूद केलं होतं.

हेही वाचा : Sharad Pawar News: काही प्रश्नावर वेगळी मते असली तरी, एका विचाराने काम करणार- शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.