ETV Bharat / state

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धीरेंद्र शास्त्री राबवत आहेत अजेंडा; राजकीय पक्षांसह विश्लेषकांनी व्यक्त केलं मत - धीरेंद्र शास्त्री

Bageshwar Dham: बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री (Bageshwar Dham Dhirendra Shastri) यांनी पुण्यातील एका प्रवचनात भारताला हिंदू राष्ट्र करण्याची मागणी केली आणि गरज पडल्यास संविधानात दुरुस्ती करावी असंही म्हटलं. धीरेंद्र शास्त्री यांचं वक्तव्य हे काही पक्षांना राजकीय दृष्ट्या मदत करणारं आहे. मतांचं ध्रुवीकरण व्हावं, यासाठी हा अजेंडा राबवला जात असावा, अशी शक्यता राजकीय पक्षांसह विश्लेषकांनी (Political Analyst) व्यक्त केली आहे.

Bageshwar Dham
बागेश्वर धाम
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 22, 2023, 10:33 PM IST

प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रवक्ते काका कुलकर्णी

मुंबई Bageshwar Dham : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात प्रवचन करत आहेत. या प्रवचनादरम्यान धीरेंद्र शास्त्री (Bageshwar Dham Dhirendra Shastri) यांनी भारत हे हिंदू राष्ट्र व्हावे अशी मागणी केली. तसंच यासाठी केंद्र सरकारला घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता असेल तर घटनादुरुस्ती सुद्धा करावी असंही त्यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मात्र अशा प्रकारचं वक्तव्य यापूर्वी अनेक नेत्यांनी केलं आहे. अलीकडे हिंदू राष्ट्राचा आग्रह फार कोणी धरताना दिसत नाही. मात्र आता चार राज्यांमधील निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर त्यांनी ही केलेली मागणी एका विशिष्ट पक्षासाठी मतांचं ध्रुवीकरण करण्या करिता आहे का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते काका कुलकर्णी (Kaka Kulkarni) यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर जोरदार प्रहार केला.

धीरेंद्र शास्त्री यांनी देश सोडून जावा : यासंदर्भात बोलताना काका कुलकर्णी म्हणाली की, शास्त्री यांनी केलेलं हिंदू राष्ट्र बनवण्यासंदर्भातील वक्तव्य हे धार्मिक नाही तर राजकीय वक्तव्य आहे. या वक्तव्याला निश्चितच राजकीय पार्श्वभूमी आहे. त्याचं कारण आहे की, पंतप्रधान मोदींचा अजेंडा चालवण्याचं काम बागेश्वर बाबा करत आहेत. या देशामध्ये पुरोगामी असणाऱ्या लोकांचा अपमान करणं, संत परंपरांचा अपमान करणं हे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. येणाऱ्या निवडणुकांचा कल बघता आजच्या अनेक संस्थांनी एक्झिट पोल दिला. या एक्झिट पोलमध्ये भाजपा कुठेतरी मागे पडत आहे हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळं धीरेंद्र शास्त्री यांना पुढे करून हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडून या देशातला हिंदू ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र राज्यामध्ये तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. अशा कुठल्यातरी बाबाच्या मागणीमुळे भारत हिंदू राष्ट्र होणार नाही, हे निश्चित आहे. हा देश समतेचा आहे, हा देश सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे. धीरेंद्र शास्त्री यांना माझा सवाल आहे की, ते भारताचे संविधान मानत नाहीत का? संविधानानुसार या देशांमध्ये समता आहे, संविधान जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही देश सोडून जायला पाहिजे.

धीरेंद्र शास्त्रींवर कारवाई का नाही : यासंदर्भात राजकीय विश्लेषक आनंद गायकवाड (Political Analyst Anand Gaikwad) म्हणाले की, धीरेंद्र शास्त्री हे निवडणुका प्रभावित करण्यासाठीच अशी वक्तव्यं करत आहेत. या चार राज्यातील निवडणुका असतील किंवा लोकसभेची निवडणूक असेल ती प्रभावित व्हावी, हिंदू मतांचं ध्रुवीकरण व्हावं यासाठी हिंदूवादी पक्ष अथवा हिंदुत्ववादी विचारसरणीच्या संघटना यांना मदत व्हावी यासाठी अशा पद्धतीची वक्तव्यं केली जात आहेत. वास्तविक धीरेंद्र शास्त्री यांनी यापूर्वी अनेकदा समाजात ते निर्माण करणारी वक्तव्यं केली आहेत. मात्र त्यांच्यावर केंद्र सरकार कुठलीही कारवाई करताना दिसत नाही. अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारचा याला कुठेतरी पाठिंबा आहे असं म्हणता येईल. मात्र आता देशातील जनता ही शहाणी झालेली आहे. अशा पद्धतीच्या वक्तव्यांना फारसा प्रतिसाद मिळेल अशी चिन्हे दिसत नाहीत. वास्तविक हिंदु राष्ट्राच्या मागणीलाही फारसा प्रतिसाद दिसत नाही, केवळ निवडणुका प्रभावित कराव्यात यासाठीच अशा पद्धतीची वक्तव्य केली जात आहेत.

हिंदु राष्ट्राची मागणी तग धरणार नाही : धीरेंद्र शास्त्री यांनी पुण्यात भारताला हिंदू राष्ट्र करण्याची मागणी केली आहे. वास्तविक ही मागणी नवी नाही. यापूर्वी वीर सावरकरांनी हिंदू राष्ट्राची मागणी केली होती. त्यानंतर अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी अखंड हिंदुस्तानची मागणी पुढे रेटली आहे. आता पुन्हा एकदा धीरेंद्र शास्त्री यांनी हिंदू राष्ट्राची मागणी करणं ही बाब राजकीय दृष्ट्या काही अंशी प्रभावित करणारी असू शकते. मात्र या मागणीला आता फारसा प्रतिसाद मिळणार नाही. लोकांमध्ये हिंदू राष्ट्र व्हावे यासाठी फार आग्रही भूमिका दिसत नाही. केवळ काही पक्षांना याचा फायदा व्हावा म्हणून जर ही भूमिका कोणी मांडत असेल तर, ती फार काळ तग धरणार नाही. अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -

  1. Bageshwar Baba On Bajrang Bali : बजरंग बलीला विरोध करण्याचा अधिकार कोणालाच नाही - बागेश्वर बाबा
  2. Bageshwar Dham In Thane: बागेश्वर बाबा चौथ्यांदा ठाणे जिल्ह्यात; अंबरनाथमध्ये रामकथा आणि हनुमान कथेचे आयोजन
  3. Case Against Bageshwar Dham : देवाचा अवतार सांगून फसवणूक केल्याचा आरोप; बागेश्वर बाबाविरोधात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.