ETV Bharat / state

तिसरे मुंबई कलेक्टीव्ह : आज पत्रकार एन. राम राफेलवर काय बोलणार? - PATRKAR

यावर्षी 'कृषी क्षेत्रावरील अरिष्ट' यावर छायाचित्र प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. या वैचारिक महोत्सवात विविध विषयांवर परिसंवाद, प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असते.

पत्रकार एन. राम
author img

By

Published : Mar 10, 2019, 4:12 PM IST

मुंबई - 'मुंबई कलेक्टीव्ह' या चर्चासत्राचेतिसरे आवर्तनयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे आयोजित करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही ‘समकालीन महत्वाच्या मुद्द्यांवर अनेक दिग्गज वक्ते उपस्थितांना संबोधणार आहेत.पत्रकार एन. राम हे आज याठिकाणी भाषण करणार असून राफेल प्रकरणी ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सहिष्णूता यासारख्या संविधानिक मूल्यांना सामोरे ठेवून २०१६ मध्ये 'मुंबई कलेक्टीव्ह'चे पहिल्यांदा आयोजन करण्यात आले होते. यावर्षी 'कृषी क्षेत्रावरील अरिष्ट' यावर छायाचित्र प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे.या वैचारिक महोत्सवात विविध विषयांवर परिसंवाद, प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असते. यंदा कोण कोणत्या विषयावर भाष्य करणारे आहे ते पाहू यात...

- ज्येष्ठ पत्रकार एन. राम हे 'राफेल आणि मोदी' या विषयांवर मांडणी करतील. तर, ज्येष्ठ इतिहास तज्ञ इरफान हबीब 'व्हॉट्स अॅप विद्यापीठ: देशभक्ती २.०' या विषयावर मांडणी करतील.

- किसान सभेचे महाराष्ट्र सरचिटणीस अजित नवले आणि सीटूचे नेते तपन सेन हे अर्थव्यवस्था : अच्छे दिन कुठे गेले?, यावर आपले विचार व्यक्त करतील.

- अर्थतज्ञ आर. नागराज आणि राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे माजी आयुक्त पी.सी. मोहन हे ‘हरवलेला रोजगार, दिशाभूल करणारी आकडेवारी’ यावर अभ्यासपूर्ण मांडणी करतील.

- लेखक कवंल भारती, राजकीय विश्लेष्क मंजरी काटजू हे ‘भारतीय लोकशाहीचे हिंदूत्वकरण’ यावर मांडणी करतील. सुप्रसिद्ध लेखक-पटकथाकार-गीतकार जावेद अख्तर हे ‘धर्मनिरपेक्षता’ या विषयावर संवाद साधतील. त्याशिवाय जावेद अख्तर आपल्या काही कविताही सादर करतील.

- माजी न्या. गोपाल गौडा आणि जगदीप चोक्कर हे 'संविधानिक संस्थांवर हल्ला' या विषयावर आपले विचार व्यक्त करतील. त्याशिवाय शास्त्रज्ञ टी. जयरामन, अनिकेत सुळे आणि मेधा राजाध्यक्ष हे ‘विज्ञानावरील सर्जिकल स्ट्राइक’ या महत्त्वाच्या विषयावर मांडणी करतील.

कार्यक्रमामध्ये काव्य वाचन, नाट्य वाचन असे बहुविध सांस्कृतिक कार्यक्रमदेखील असणार आहेत. पहिल्या दोन कलेक्टीव्ह प्रमाणे यावर्षीही अनेक सजग नागरिक मोठ्या प्रमाणे उपस्थित राहतील, अशी खात्री आयोजकांनी व्यक्त केले आहे. यंदाच्या मुंबई कलेक्टीव्हमध्ये देखील मुंबईकरांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मुंबई कलेक्टीव्ह' चे  तिसरे आवर्तन

मुंबई

मुंबई कलेक्टीव्ह' चे  तिसरे आवर्तन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे आयोजित करण्यात आले आहे.
अनेक वक्ते यावेळी उपस्थितांना संबोधणार आहेत. एन राम यांचे आज याठिकाणी भाषण करणार आहेत  राफेल प्रकरणी ते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लक्ष लागले आहे.

आपल्या जगण्याच्या प्रेरणा नेमक्या काय असतात ? एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाला, कुटुंब म्हणून, राज्य किंवा देश म्हणून प्रत्येकाला काहीतरी प्रेरणा असतात. व्यक्तीला ,कुटुंबाला जशी प्रेरणा असते तशी समाज म्हणून राज्य-देशाला संपूर्ण पिढीला प्रेरणा असते. आपल्या समोर आज महत्वाच्या प्रेरणा काय आहेत ?  सर्व बाजून प्रश्नांकित आपल्याला पुढे  काय ? याचा विचार करणे आज गरजेचं झालं आहे. 

या पार्श्वभूमीवर  देशापुढील जनतेच्या दृष्टीने महत्वाच्या विषयांवर चर्चा घडवून आणत लोकांचे लक्ष वेधणाऱ्या 'मुंबई कलेक्टिव्ह' या चर्चासत्राच्या तिसऱ्या आवर्तनाचे आयोजन यंदा १० मार्च रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही ‘मुंबई कलेक्टिव्ह’मधून समकालीन चर्चाविषय हाताळले जाणार आहेत.

यंदा मुंबई कलेक्टीव्हचे तिसरे वर्ष आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सहिष्णूता यासारख्या संविधानिक मूल्यांना सामोरे ठेवून २०१६ मध्ये 'मुंबई कलेक्टीव्ह' चे पहिल्यांदा आयोजन करण्यात आले होते. या वैचारिक महोत्सवात विविध विषयांवर परिसंवाद, प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असते. 

ज्येष्ठ पत्रकार एन. राम हे 'राफेल आणि मोदी' या विषयांवर मांडणी करतील. तर, ज्येष्ठ इतिहास तज्ञ इरफान हबीब 'व्हॉट्स अॅप विद्यापीठ: देशभक्ती २.०' या विषयावर मांडणी करतील.किसान सभेचे महाराष्ट्र सरचिटणीस अजित नवले आणि सीटूचे नेते तपन सेन हे अर्थव्यवस्था: अच्छे दिन कुठे गेले? यावर आपले विचार व्यक्त करतील. 

अर्थतज्ञ आर. नागराज आणि राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे माजी आयुक्त पी.सी. मोहन हे ‘हरवलेला रोजगार, दिशाभूल करणारी आकडेवारी’ यावर अभ्यासपूर्ण मांडणी करतील. 

लेखक कवंल भारती, राजकीय विश्लेष्क मंजरी काटजू हे ‘भारतीय लोकशाहीचे हिंदूत्वकरण’ यावर मांडणी करतील. सुप्रसिद्ध लेखक-पटकथाकार-गीतकार जावेद अख्तर हे ‘धर्मनिरपेक्षता’ या विषयावर संवाद साधतील. त्याशिवाय जावेद अख्तर आपल्या काही कविताही सादर करतील. 

माजी न्या. गोपाल गौडा आणि जगदीप चोक्कर हे 'संविधानिक संस्थांवर हल्ला' या विषयावर आपले विचार व्यक्त करतील. त्याशिवाय शास्त्रज्ञ टी. जयरामन, अनिकेत सुळे आणि मेधा राजाध्यक्ष हे ‘विज्ञानावरील सर्जिकल स्ट्राइक’ या महत्त्वाच्या विषयावर मांडणी करतील. सोबतीला 'कृषी क्षेत्रावरील अरिष्ट' यावर छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. 

कार्यक्रमामध्ये काव्य वाचन, नाट्य वाचन असे बहुविध सांस्कृतिक कार्यक्रमदेखील असणार आहेत. पहिल्या दोन कलेक्टीव्ह प्रमाणे याही वर्षी अनेक सजग नागरिक मोठ्या प्रमाणे उपस्थित राहतील अशी आयोजकांना खात्री आहे. यंदाच्या मुंबई कलेक्टीव्हमध्येदेखील मुंबईकरांनी, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

एन राम यांचा फोटो वापरावा. 
y b चव्हाण चे फाईल फुटेज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.