ETV Bharat / state

रिक्त जागा भरण्यासाठी जे जे रुग्णालयातील परिचारिका आक्रमक; कामबंद आंदोलनाचा इशारा - जे जे रुग्णालय परिचारिका आंदोलन

जे जे रुग्णालयातील अनेक पदे रिक्त असून ही पदे लवकरात लवकर भरावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

jj-hospital-nurses-aggressive-to-fill-vacancies-in-mumbai
रिक्त जागा भरण्यासाठी जे जे रुग्णालयातील परिचारिका आक्रमक; कामबंद आंदोलनाचा दिला इशारा
author img

By

Published : Nov 9, 2020, 6:08 PM IST

मुंबई - जे जे रुग्णालयातील 150 पदे रिक्त असून ही पदे भरली जावी, यासाठी परिचारिका संघटना, चतुर्थ श्रेणी संघटना सातत्याने पाठपुरावा करत आहेत. पण याकडे रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. परिणामी अपुऱ्या मनुष्यबळामुळे परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत आहे. त्यामुळे आता परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी आता आक्रमक झाले आहेत. येत्या आठवड्याभरात या मागण्यांवर प्रशासनाने काही ठोस निर्णय घेतला नाही, तर कामबंद आंदोलनाचा इशारा या संघटनांनी दिला आहे.

150 पदे रिक्त
जे जे रुग्णालय हे नामांकित रुग्णालय असून सर्व प्रकारच्या आजारांवर येथे उपचार केले जातात. त्यामुळेच केवळ मुंबई, महाराष्ट्रातून नव्हे, तर देशभरातून येथे रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे या रुग्णालयात बारा महिने रुग्णांची गर्दी असते. अशात या रुग्णांना सेवा देण्याची जबाबदारी ज्या परिचारिका आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर आहे. त्यांची संख्या कमी असल्याची महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा हेमलता गजबे यांनी दिली आहे. चतुर्थ श्रेणीच्या 80, परिचारिकेच्या 30 तर जीएमसीच्या 40 अशी एकूण 150 पदे रिक्त आहेत. ही पदे कायम स्वरूपी भरण्याची गरज आहे. ही पदे भरली गेली, तर रुग्ण सेवा आणखी चांगल्या प्रकारे देता येईल, असेही गजबे यांनी म्हटले.

गेट मीटिंगमध्ये परिचारिका-कर्मचारी आक्रमक
रिक्त पदे भरण्याबरोबरच निवृत्त परिचारिकांच्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न प्रलंबित असून इतरही अनेक प्रश्न मार्गी लागताना दिसत नाहीत. या सर्व प्रलंबित मागण्यांसाठी सर्व संघटना सातत्याने पाठपुरावाही करत आहेत. पण रुग्णालय प्रशासन आणि राज्य सरकार मात्र याकडे लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यात परिचारिका संघटना आणि चतुर्थ श्रेणी संघटनानी गेट मीटिंग घेतली. या गेट मीटिंगमध्ये कर्मचारी-परिचारिका आक्रमक होत्या. त्यामुळेच आता प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यानुसार आठवड्याभरात यावर काही तोडगा निघाला नाही, तर कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेनी घेतला असल्याची माहिती, गजबे यांनी दिली.

हेही वाचा- अर्णब गोस्वामी प्रकरणी राज्यपालांचा गृहमंत्र्यांना फोन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.