ETV Bharat / state

Jitendra Awhad Tweet : एमपीएससीला आता महाराष्ट्राच्या इतिहासाची आणि समाजसुधारकांचीदेखील गरज उरलेली नाही- जितेंद्र आव्हाड - महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधील अभ्यासक्रमात गट 'क' आणि गट 'ब' साठी महाराष्ट्राचा इतिहास वगळला (Jitendra Awhad tweet regarding exclusion) आहे. इतिहास वगळला असल्यामुळे महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा अभ्यास देखील आता होणार नाही. यासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट (history of social reformers from MPSC syllabus) करून शासनाला खोचक प्रश्न देखील विचारलेला आहे.

MPSC
जितेंद्र आव्हाड यांचे खोचक ट्विट
author img

By

Published : Nov 27, 2022, 8:06 AM IST

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधील अभ्यासक्रमात गट 'क' आणि गट 'ब' साठी महाराष्ट्राचा इतिहास वगळला आहे. इतिहास वगळला असल्यामुळे महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा अभ्यास देखील आता होणार (history of social reformers from MPSC syllabus) नाही. त्याबाबत एमपीएससीच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये चिंता आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून शासनाला खोचक प्रश्न देखील विचारलेला (Jitendra Awhad tweet regarding exclusion) आहे.

अभ्यासक्रमामध्ये सुधार : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अभ्यासक्रम बदलासाठी दळवी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने परीक्षा पद्धतीमध्ये आणि अभ्यासक्रमामध्ये सुधार करण्याचा निर्णय घेतला. आता त्यानंतर प्रत्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ही बाब लक्षात आली आहे की, परीक्षेच्या मुख्य परीक्षेमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे इतिहास आणि समाजसुधारकांचा इतिहास त्यामध्ये नाही. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात ट्विटरवर प्रश्न आणि खुलासे विचारणे सुरू केलेले (Jitendra Awhad tweet)आहे.

प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र स्टुडंट असोसिएशन नेते विद्यार्थी विकास शिंदे

प्रश्न विचारून धारेवर धरण्याचा प्रयत्न : एमपीएससीच्या अभ्यासक्रमांमधून मुख्य परीक्षेसाठी इतिहास विषय वगळल्यामुळे विद्यार्थ्यांनी एमपीएससीला प्रश्न विचारून धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. त्याला अनुरूप राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर शासनावर टीका करत खोचक प्रश्न विचारलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आता महाराष्ट्राच्या इतिहासाची आणि समाजसुधारकांची देखील गरज उरलेली नाही, याची जाणीव झाल्याच्या आम्हाला (Jitendra Awhad on MPSC) समजले.

येणाऱ्या पिढीवर वाईट परिणाम : या संदर्भात महाराष्ट्र स्टूडेंट असोसिएशनचे नेते विद्यार्थी विकास शिंदे यांनी सांगितले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता महाराष्ट्रातील इतिहास हा विषय मुख्य परीक्षेमधून वगळला. आणि महाराष्ट्रातील महापुरुष देखील मुख्य परीक्षेतून त्याच्या अभ्यासक्रमातून वगळल्या असल्यामुळे याचा मोठा परिणाम पुढच्या पिढीवर होणार आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांनी समाजसुधारकांनी उदाहरणार्थ महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज आणि महाराष्ट्रातील सर्वांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांचा इतिहास जर मुख्य परीक्षेच्या विषयातून वगळला, तर त्याचे वाईट परिणाम येणाऱ्या पिढीवर नक्कीच होणार आहे. असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.