ETV Bharat / state

Jitendra Awhad Reaction: तुम्हाला नेमणूक करण्याचा अधिकार कोणी दिला - जितेंद्र आव्हाड यांचा सवाल - Jitendra Awhad Reaction

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नसल्याचा आरोप अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांच्याकडून पत्रकार परिषदेत करण्यात आला. त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या पत्रकार परिषदेचा समाचार घेतला.

Jitendra Awad
जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Jul 7, 2023, 10:37 PM IST

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिल्लीतील बैठक बेकायदेशीर असल्याचा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला. कोणते निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचा आरोप अजित पवार गटाने केला आहे. यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आजची पत्रकार परिषद गोंधळलेल्या अवस्थेत झाली असल्याचा टोला प्रफुल्ल पटेल यांना लगावला. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना काहीच अधिकार नाही तर तुम्ही कशा नेमणुका केल्या. त्यांना अधिकार नाही तर तुम्हाला देखील नाही. न्यायाधीश धनंजय चंद्रचुड म्हणतात की, 10 वे शेड्युल हे फेरफार थांबविण्यासाठी आहे. पक्षांतर्गत कायदा हा फेरफार रोखण्यासाठी करण्यात आला होता. आमदारांनी पक्षासोबत बंडाळी करू नये त्यामागचा उद्देश असावा. तुम्हाला नेमणूक करण्याचा अधिकार कोणी दिला? कोणत्या अधिकाराने तुम्ही म्हणतात की, शरद पवारांना कोणताही अधिकार नाही.

पक्षांतर निवडणुक झाला नसल्याचा आरोप : पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या नसल्याचा आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. याला उत्तर देताना आव्हाड म्हणाले की, मात्र त्याच कालावधीत तुम्ही जिंकून येऊन पदावरती बसला. तुम्हाला आमदार मंत्रीपद कोणामुळे मिळाले तर त्याचे उत्तर शरद पवारांमुळे. त्याच पवार यांना तुम्ही संविधान कळत नसल्याचा आरोप करत आहात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संविधान चुकीचे आहे हे कधी म्हणता तर, सगळे मिळून झाल्यानंतर. माझी लढाई संविधानासाठी आहे कोणी वैयक्तिक घेऊ नये असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

देशाला माहीत आहे राष्ट्रवादी कोणाची : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची घटना फ्रॉड असल्याचा आरोप करून, शरद पवार यांच्यावर ठपका ठेवण्याचे काम केले जात आहे. या देशाच्या प्रत्येक नागरिकाला माहीत आहे की, शरद पवार संविधानिक रित्या नियुक्त केलेले राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत. मग राष्ट्रवादी पक्षातून तुम्ही खासदार झालात, आमदार झालात मग जर हे फ्रॉड होते तर तुम्ही पण फ्रॉडच होता की..?असा सवालाही विचारला आहे. पक्ष सोडताना पक्षाला नालायक म्हणायचे का? असाही टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. तुमच्यासाठी भाजपाचे दरवाजे उघडे आहे, जर तुमच्याकडे दोन तृतीअंश पाठबळ आहे तर तुम्ही भाजपात मर्ज व्हावे असा सल्ला, जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटाला दिला आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis : शरद पवार पक्षाचे अध्यक्ष तर पटेल-तटकरेंवरील कारवाई मान्य आहे का, जितेंद्र आव्हाडांची रोखठोक सवाल
  2. Maharashtra Political crisis: राहुल नार्वेकर-फडणवीस यांच्यात बैठक, जितेंद्र आव्हाड यांनी घेतला आक्षेप
  3. Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.