मुंबई - जागतिक बॅंकेने भारताचे विकसनशील देशाच्या यादीतले नाव रद्द केले आहे. त्यामुळे भारत आता कमी उत्पन्न गटात मोडला जाणार आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. पाकिस्तानचे नाव घेता-घेता आपण पाकिस्तानच्याच पंगतीत येऊन बसलो. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. याबद्दल मोदी-शाहंचे अभिनंदन, असे ट्वीट आव्हाड यांनी केले आहे.
-
वर्ल्ड बॅंकेने भारताचे विकसनशील देशाच्या यादीतले नाव रद्द केले.भारत Lower Income Category मध्ये मोडला जाणार आहे. भारताच्या बरोबर झांबिया, घाना, पाकिस्तान, बांग्लादेश या देशांचा समावेश आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
पाकिस्तानचे नाव घेता-घेता आपण पाकिस्तानच्याच पंगतीत येऊन बसलो. याबद्दल मोदी-शहांचे अभिनंदन pic.twitter.com/SOXQJ83E76
">वर्ल्ड बॅंकेने भारताचे विकसनशील देशाच्या यादीतले नाव रद्द केले.भारत Lower Income Category मध्ये मोडला जाणार आहे. भारताच्या बरोबर झांबिया, घाना, पाकिस्तान, बांग्लादेश या देशांचा समावेश आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 16, 2019
पाकिस्तानचे नाव घेता-घेता आपण पाकिस्तानच्याच पंगतीत येऊन बसलो. याबद्दल मोदी-शहांचे अभिनंदन pic.twitter.com/SOXQJ83E76वर्ल्ड बॅंकेने भारताचे विकसनशील देशाच्या यादीतले नाव रद्द केले.भारत Lower Income Category मध्ये मोडला जाणार आहे. भारताच्या बरोबर झांबिया, घाना, पाकिस्तान, बांग्लादेश या देशांचा समावेश आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 16, 2019
पाकिस्तानचे नाव घेता-घेता आपण पाकिस्तानच्याच पंगतीत येऊन बसलो. याबद्दल मोदी-शहांचे अभिनंदन pic.twitter.com/SOXQJ83E76
एकेकाळी प्रमुख राष्ट्राबरोबर भारत तुलना करत होता. मात्र, आता आपण पाकिस्तानच्या मांडीला मांडी लावून बसलो. हे वेदनादायी असल्याचे आव्हाड म्हणाले. आपला देश पुढे गेला पाहिजे. आपल्या देशाने जागतिक स्पर्धेत अमेरिकेला मागे टाकले पाहिजे असे आव्हाड म्हणाले. राजकीय द्वेष, सत्ता मिळवण्याचा हव्यास यातून या गोष्टी घडत असल्याचे आव्हाड म्हणाले.
जागतिक बॅंकेने भारताचे विकसनशील देशाच्या यादीतले नाव कमी केल्याने भारत आता झांबिया, घाना, पाकिस्तान, बांग्लादेश या देशांच्या पंगतीत गेला आहे. पाकिस्तानचे नाव घेता घेता आपण पाकिस्तानच्या पंगतीत गेल्याचे आव्हाड म्हणाले. या घटनेबद्दल मोदी - शाहंचे अभिनंदन असे म्हणत आव्हाड यांनी टोला लगावला.