ETV Bharat / state

Jayant Patil : तटकरेंसोबतची गळाभेट, जयंत पाटील म्हणाले, 'मी शरद पवार..' - जयंत पाटील सुनील तटकरे गळाभेट

सुनील तटकरे यांची विधिमंडळाच्या लॉबीत गळाभेट घेतल्याप्रकरणी जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'आमचे संबंध चांगले आहेत. यातून कोणीही वेगळा अर्थ काढण्याचं कारण नाही', असे ते म्हणाले आहेत.

Jayant Patil Sunil Tatkare
जयंत पाटील सुनील तटकरे गळाभेट
author img

By

Published : Jul 24, 2023, 8:17 PM IST

Updated : Jul 24, 2023, 8:54 PM IST

मुंबई : सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा विधिमंडळाच्या लॉबीतील एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. आता यावर जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 'मी शरद पवार यांच्यासोबतच असून कोणीही गैरसमज करून वेगळा अर्थ काढण्याचं कारण नाही', असे ते म्हणाले आहेत.

'ऋणानुबंध असू शकतात' : जयंत पाटील म्हणाले की, तटकरे वेगळ्या पक्षात आहेत. मी आता वेगळ्या पक्षात आहे. मात्र आमच्यात ऋणानुबंध असू शकतात. त्याचा राजकीय अर्थ काढू नये. माझं सगळ्यांशी चांगल नातं आहे. माझे संबंध चांगले आहेत. मी शरद पवार यांच्यासोबतच आहे, त्यामुळे वेगळा अर्थ काढू नये, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले आहे.

'आमच्यात खासगी विनोद झाला' : जयंत पाटील पुढे म्हणाले की, 'मी तटकरे यांच्या सोबत 30 वर्षे काम केले आहे. माझा त्यांच्यासोबत तेथे खासगी विनोद झाला. माझं आणि त्यांचं व्यक्तिगत स्वरूपात बोलणं होतं. आमच्यात खाजगी चर्चा झाली, त्यातून विनोद झाला. मात्र विधानसभा सभागृहात चोरुन फोटो काढणारे आहेत. अशा फोटो काढणाऱ्यांवर बंदी घातली पाहीजे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

'गळाभेट समोरून असते, मागून नाही' : या प्रकरणी जयंत पाटील पुढे म्हणाले की, मी अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांसोबत जेवण केलं. मात्र सोडून गेलेल्या आमदारांसोबत 'मन की बात' होत नाही. गळाभेट समोरून असते, ती मागून होत नाही, असे त्यांनी नमूद केले. जयंत पाटील यांचा सुनील तटकरे यांच्याशी मागून गळाभेट घेतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले : ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार या महिन्यात मुख्यमंत्री होणार आल्याचा दावा केला आहे. यावर जयंत पाटील म्हणाले की, 'पृथ्वीराज चव्हाण हे माझ्यापेक्षा ज्येष्ठ नेते आहेत. जर त्यांना अशा प्रकारची माहिती मिळालेली असेल तर मी त्यांच्या वक्तव्याचे खंडन करणार नाही. मात्र जर-तर वर शुभेच्छा द्यायच्या नसतात. आज घाई करण्याची गरज नाही. आम्ही आमच्या जागेवर शांत आहोत', असे ते शेवटी म्हणाले.

हेही वाचा :

  1. Devendra Fadnavis on Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितले...
  2. Deepak Kesarkar : एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांवरून टीका करणाऱ्या ठाकरे पिता-पुत्रांना दीपक केसरकरांचा टोला, म्हणाले...
  3. Monsoon Session 2023 : आमदार फोडण्यासाठी आणि फोडलेले आमदार सांभाळण्यासाठीच पुरवणी मागण्या - थोरातांचा आरोप

Last Updated : Jul 24, 2023, 8:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.